vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशस्थानिक बातम्या

पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागातील-सहायक आयुक्त पदाच्या 311 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू· पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे ठोस निर्णय..

पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागातील-सहायक आयुक्त पदाच्या 311 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू· पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे ठोस निर्णय..

मुंबई, प्रतिनिधी : पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम होण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध ठोस निर्णय घेतले आहेत. पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे.

पशुसंवर्धन विभागाने पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी एकापाठोपाठ एक असे महत्वाचे निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.  विभागातील रिक्त पदांमुळे पशुपालक, शेतकरी यांना सेवा देण्यास येणारी अडचण लक्षात घेऊन विभागातील आवश्यक पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी त्यांनी पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आले.

त्यानंतर आता प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या संवर्गातील सहायक आयुक्त, पशुसंवर्धन ही ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवले. या भरतीची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी श्रीमती मुंडे यांनी पाठपुरावा केला.एम पी एस सी ने सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून २० जून २०२५ पर्यंत अर्ज मागविले आहेत.

कामास येणार गतीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून पशुसंवर्धन विभागाला सक्षम आणि नवीन अभ्यासू अधिकारी मिळणार आहेत. त्यातून ग्रामीण भागातील पशुसंवर्धन विभागाचे काम आणखी वेगाने व पूर्ण क्षमतेने होण्यास मदत होणार असून पशुपालकांना चांगल्या दर्जाची सेवा मिळणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

परिवहन सेवांसाठी अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा Ø परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

धारावीतील ज्येष्ठांनी मांडली प्रदूषण मुक्त दिवाळीची संकल्पना…

vishwatmaklokswamivarta

मानसिक आरोग्य आढावा मंडळावर अशासकीय सदस्यांना अर्ज करण्याचे आवाहनअर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत अंतिम मुदत  मंडळात लातूर, नांदेड, बीड,धाराशिव जिल्ह्याचा समावेश

संरक्षित खतसाठा पुरवठा कालमर्यादेचे पालन करावे- जिल्हाधिकारी स्वामी

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत कंत्राटी भरती12 नोव्हेंबर, 2025 रोजी थेट मुलाखत

vishwatmaklokswamivarta

वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ अभ्यासक्रमांतर्गत तीर्थक्षेत्रातील सेवांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नाशिक कुंभमेळ्यात भाविकांच्या सेवेसाठी हजारो तरुण राहणार कार्यरत

vishwatmaklokswamivarta