vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा-22 वा हप्ता होणार 13 मार्चला वितरित,राज्यातील 91 लाख शेतकरी कुटुबांना 1,837 कोटी रुपयांचा लाभसमारोहचे थेट प्रक्षेपन https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर उपलब्ध

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा-22 वा हप्ता होणार 13 मार्चला वितरित,राज्यातील 91 लाख शेतकरी कुटुबांना 1,837 कोटी रुपयांचा लाभसमारोहचे थेट प्रक्षेपन https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर उपलब्ध

 

        अमरावती प्रतिनिधी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीतील 22 वा हप्ता प्रधानमंत्री नंरेद्र मोदी यांच्या हस्ते 13 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता आसाममधील ज्योती-बिष्णु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, खानापारा, गुवाहाटी येथून वितरित होणार अशी माहिती कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.     केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक मदत देण्यासाठी फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2 हजार रुपयेप्रमाणे एकूण 6 हजार रुपये थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जातात.

        महाराष्ट्रातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेअंतर्गत आतापर्यंत 21 हप्त्यांमधून सुमारे 39 हजार 300 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी भूमी अभिलेख नोदंणी अद्ययावत करणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे तसेच ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करणे या बाबी अनिवार्य करण्यात आल्या आहेत    सद्यस्थितीत राज्यातील या तीनही बाबी पूर्ण केलेल्या सुमारे 91.19 लाख शेतकरी कुटुंबांना 13 मार्च रोजी सुमारे 1,837 कोटी रुपयांचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

      या कार्यक्रमानिमित्त राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा व तालुका कार्यालये, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या (ईपीसी एस), शेतकरी उत्पादक संघटना (ईपीओ एस) तसेच सहकारी पतसंस्था (पीएसीएस) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच नागरी सुविधा केंद्रांवरूनही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

       कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https://pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

पडताळणीअंती नवी मुंबईत आढळले 13336 दुबार मतदार-दोनपैकी कोणत्या एका ठिकाणी मतदान करणार भरुन घेतले हमीपत्र

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना आवाहन

ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण २०२५ : ग्रामपंचायतींनी सर्वेक्षणासाठी सज्ज व्हावे – मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले 

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

अचूक जनगणनेसाठी सजग राहून काम करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे,· तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू