vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीसाठी कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांचे तीव्र आंदोलन!चुकीचा वा धार्मिक भावना दुखावणारा इतिहास मांडणाऱ्या या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन..

 ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीसाठी कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांचे तीव्र आंदोलन!चुकीचा वा धार्मिक भावना दुखावणारा इतिहास मांडणाऱ्या या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन..

कोल्हापूर प्रतिनिधी- कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप करत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने कोल्हापुरातील शिवाजी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. या पुस्तकाद्वारे महाराजांचा जाज्वल्य इतिहास लोकांसमोर विकृत करून मांडला आहे. चुकीचा वा धार्मिक भावना दुखावणारा इतिहास मांडणाऱ्या या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले. निवेदन स्वीकारल्यावर शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकात ‘भवानी देवीने छत्रपती शिवाजी महाराज यांना तलवार दिलीच नाही’, तसेच “हिंदु धर्मावरील निष्ठेमुळे शिवाजीला यश प्राप्त झाले, हे खरे नाही” असे दावे करण्यात आले असून, ते ऐतिहासिक पुराव्यांच्या पूर्णतः विपरीत आहे. तसेच ‘हिंदवी स्वराज्य’ ही महाराजांची स्वतःची इच्छा होती, हा त्यांचा मूलभूत विचारही पुस्तकात नाकारण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे हिंदू अस्मितेचा पाया असलेल्या महापुरुषांचे ‘वैचारिक खच्चीकरण’ करण्याचा एक सुनियोजित कट आहे. राजमाता जिजाबाई यांनी महाराजांना रामायण-महाभारत आदी धर्मग्रंथांतील कथा सांगून त्यांना मोघलांच्या विरोधात लढण्यासाठी सिद्ध केले. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्या बुडवल्या. मोगलांना यमसदनी धाडले. अनेक ठिकाणी मंदिरे उभारली. ते हिंदूंचे राजे झाले. असे असतांना या पुस्तकाद्वारे त्यांची पूर्णत: चुकीची प्रतिमा निर्माण केली गेली आहे.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, भाजपचे श्री. महेश जाधव, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, आरोग्य भारतीच्या वैद्या अश्विनी माळकर, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदु महासभा महिला आघाडीच्या शीलाताई माने, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. रामभाऊ मेथे, हिंदुत्वनिष्ठ श्री. सुहास चव्हाण, श्री. शशी बीडकर, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम जरग यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलकांनी सरकारकडे या पुस्तकाच्या विक्रीवर आणि वितरणावर तात्काळ बंदी घालण्याची आग्रही मागणी केली आहे. महाराजांचा एकेरी उल्लेख न हटवणाऱ्या प्रकाशक आणि संबंधित संस्थांवर भारतीय न्याय संहिता कलम २९९ आणि १९६ अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे निवेदनात नमूद केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने इतिहासतज्ज्ञांची एक उच्चस्तरीय समिती नेमून या पुस्तकातील प्रत्येक विधानाचा अभ्यास करावा आणि केवळ छापील पुस्तकेच नव्हे, तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स साईट्सवर उपलब्ध असलेल्या डिजिटल प्रती आणि पीडीएफ लिंक्स सायबर कायद्यांतर्गत तात्काळ ब्लॉक कराव्यात, अशी मागणीही या वेळी करण्यात आली आहे.श्री. सुनील घनवट,राष्ट्रीय समन्वयक, हिंदु राष्ट्र समन्वय समिती,संपर्क क्र. : ७०२०३८३२६४)

—–

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधीचा 21 व्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण; बुलढाणा कृषि विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांनी देशभरातील 47 ठिकाणी 16व्या रोजगार मेळ्याचे उद्घाटन केले; 51000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे केले वितरण महाराष्ट्रातील मध्य रेल्वेद्वारे मुंबई, पुणे आणि नागपूर येथे रोजगार मेळ्याचे आयोजन; 450 हून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे वितरित

करंजा मत्स्य बंदर प्रकल्प कामांसाठी अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर करावा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• ४,५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता• दुसऱ्या टप्प्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीस मिळणार गती..

जिल्ह्यातील 3 नगर परिषदांमध्ये 68 जागांसाठी 92 हजार 864 मतदार*

vishwatmaklokswamivarta

अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण निश्चित उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदेतालुकानिहाय ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत 15 जुलैला