vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र १२ दिवसांपासून अन्नत्याग; खंडणी, तोडफोड व जीवघेण्या धमक्यांचा आरोप – प्रशासन मात्र शांत

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र १२ दिवसांपासून अन्नत्याग; खंडणी, तोडफोड व जीवघेण्या धमक्यांचा आरोप – प्रशासन मात्र शांत

 

जालना (प्रतिनिधी) : मालकी हक्काच्या लढ्यासाठी सौ. जयश्री संजय कटके यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आता बाराव्या दिवशी पोहोचले असून त्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. न्याय मिळेपर्यंत माघार नाही, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर थेट सवाल उपस्थित केला आहे. कटके यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, सुनील मोहनलाल राठी, अनिल मोहनलाल राठी, मयूर राठी, अनिल मालपाणी व सुरेश मालपाणी यांनी गुंडांच्या मदतीने त्यांच्या जागेवरील सामानाची तोडफोड केली, बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तसेच ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. इतकेच नव्हे तर जीव घेण्याचाही प्रयत्न झाल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.

या प्रकरणात संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून स्वतःच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण द्यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, १२ दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनावर कुणाचा दबाव आहे का? सामान्य नागरिकांना न्याय मिळणार की नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. उपोषणाचा तेरावा दिवस सुरू होत असताना प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अन्यथा परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

00000

संबंधित पोस्ट

सेवेदरम्यान दिव्यांगत्व प्राप्त कर्मचाऱ्यांना दिलासा अधिसंख्य पद निर्मितीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित- सचिव तुकाराम मुंढे

vishwatmaklokswamivarta

गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

नवी दिल्लीत माणीकशॉ केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले संबोधित आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा . 

vishwatmaklokswamivarta

म्हाडातर्फे सदनिकांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन26 सप्टेंबर रोजी लॉटरीची सोडत मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांची माहिती..

ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

पुणे जिल्ह्यातील मावळ  तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू. ३२ जण जखमी, बचावकार्य सुरु, दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख.