vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभासाठी उमेदवारांना पूर्व मुलाखत प्रशिक्षण**शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शेवगाव येथे दि. २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान प्रशिक्षण

*पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभासाठी उमेदवारांना पूर्व मुलाखत प्रशिक्षण**शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शेवगाव येथे दि. २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान प्रशिक्षण*

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभाचे आयोजन दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी शेवगाव येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित औद्योगिक आस्थापना सहभागी होणार आहेत.

या रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या गरजू उमेदवारांसाठी दि. २१ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शेवगाव येथे पूर्व मुलाखत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.या प्रशिक्षणामध्ये रोजगार मेळाव्याची ओळख व करिअर जागरूकता, Resume/CV प्रभावी स्वरूपात तयार करणे, मुलाखत कौशल्ये व Mock Interview, व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य, कार्यस्थळ सज्जता व व्यावसायिक वर्तन, क्षेत्रनिहाय कौशल्य अभिमुखता तसेच अंतिम पूर्वतयारी व Candidate Checklist या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त गरजू उमेदवारांनी या पूर्व मुलाखत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी उमेदवारांनी https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर नोंदणी करावी. रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीनंतर जागेवरच निवडपत्र/Offer Letter देण्यात येणार असल्याची माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शेवगाव यांच्याकडून देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शेवगाव येथे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे येथे 13 फेब्रुवारी,2026 रोजी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

लिपिकांसाठी १५ एप्रिलपासून ५० दिवसांचे लेखाविषयक प्रशिक्षण

 स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

vishwatmaklokswamivarta

मत्स्यव्यवसाय विभागाच्या व्हीजन डॉक्युमेंट 2047 मध्ये सर्वसमावेशकता असावी- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,वातावरण बदलामुळे होणाऱ्या परिणामांवर  उपाययोजनांचा प्रामुख्याने समावेश असावा

राज्यस्तरीय खरीप हंगाम 2024-25 पीक स्पर्धेमध्ये ज्वारी, बाजरी व सोयाबीन पिकामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी*