vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत

अहिल्यानगर, प्रतिनिधी – राज्यातील युवक-युवतींना उद्योग क्षेत्रात रोजगारक्षम बनवण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री रोजगार व कौशल्य विकास पॅकेजअंतर्गत “प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना” सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत एक कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार व कौशल्यांनुसार अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त रविकुमार पंतम यांनी केले आहे

योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे २ हजार कंपन्यांसोबत करार करण्यात आले असून, सहभागी होणाऱ्या प्रत्येक इंटर्नला कामावर रुजू होताना एकरकमी ६ हजार रुपये, तसेच पुढील ९ महिन्यांसाठी प्रतिमहिना ५ हजार रुपये (केंद्र सरकारचे ४,५०० व कंपनीचे ५०० रुपये) असे वार्षिक अनुदान दिले जाणार आहे. यामुळे युवकांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभवासह आर्थिक साहाय्यही मिळणार आहे.

ही योजना विशेषतः शिक्षण पूर्ण केलेल्या किंवा सध्या रोजगारात नसलेल्या बेरोजगार युवक-युवतींसाठी उपयुक्त ठरणार आहे. यासाठी वयोमर्यादा २१ ते २४ वर्षे अशी निश्चित करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांसाठी या योजनेअंतर्गत सुमारे २१७ पदांची संधी उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहितीसाठी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर अथवा ०२४१-२९९५७३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

संबंधित पोस्ट

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचे कर्ज प्रस्ताव महादिशा पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या पदसंख्येत वाढ – पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन* 

भारतीय डाक विभागाची सेल्फ बुकींग व डोरस्टेप पिकअप सुविधा; नागरिकांना घरबसल्या जलद आणि आधुनिक सेवा…

vishwatmaklokswamivarta

आदिवासी लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना२० फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रची तात्काळ कर्ज योजना

सामाजिक समता सप्ताह उत्साहात-स्वाधार व ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थ्यांना पत्राचे वाटप