vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 भरण्याचे आवाहन

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 भरण्याचे आवाहन

जालना, प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी आस्थापना, उद्योग, कारखाने तसेच 25 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या सर्व आस्थापनांनी सप्टेंबर 2026 या तिमाहीचे रोजगारविषयक विवरणपत्र ई-आर 1 ऑनलाइन पद्धतीने 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे

सेवायोजन कार्यालये (रिक्तपदांची सूचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्याअंतर्गत नियमावली 1960 नुसार संबंधित आस्थापनांना दर तीन महिन्यांनी रोजगारविषयक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीतील त्रैमासिक विवरणपत्र ई-आर 1 सादर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर 2026 आहे. हे विवरणपत्र सादर करण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित आस्थापनांनी संकेतस्थळावर लॉगिन करून एम्प्लॉयर लॉगिनमध्ये जाऊन आवश्यक माहिती भरावी. त्यानंतर विवरणपत्रातील माहिती तपासून ई-आर 1 ऑनलाइन सादर करावे.

तांत्रिक अडचणी किंवा अधिक माहितीसाठी आस्थापनांनी सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत (02482) 230333 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

निर्धारित मुदतीत विवरणपत्र ऑनलाइन सादर न केल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र आस्थापनांनी विहित मुदतीपूर्वी ई-आर 1 विवरणपत्र सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गणेश चिमणकर, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

****

संबंधित पोस्ट

नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन 2026’ एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

18 ऑगस्ट रोजी‍ शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

गडचिरोली जिल्ह्यासाठी ४८ हजार लिटर केरोसीन मंजूर सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत सात तालुक्यांमध्ये होणार वाटप

नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षणाचे क्षेत्रकार्य सुरू;नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे आवाहन

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम : सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योग उभारणीची सुवर्णसंधी