vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सेवा संकल्प अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची प्रयोगशाळेला भेट; जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता जनजागृती उपक्रम संपन्न

सेवा संकल्प अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची प्रयोगशाळेला भेट; जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता जनजागृती उपक्रम संपन्न

जालना,द प्रतिनिधी : सेवा संकल्प अभियानांतर्गत आज जालना येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाच्या जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेला भेट देऊन पाणी तपासणीच्या विविध प्रक्रिया प्रत्यक्ष समजून घेतल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला जल जीवन मिशन जिल्हा परिषद, जालना चे प्रकल्प संचालक लिंबाजी बारगिरे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मानवी आरोग्यासाठी शुद्ध पाण्याचे महत्त्व आणि पाण्याच्या गुणवत्तेबाबत समाजात जागरूक राहणे काळाची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात अधोरेखित केले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित पाणी, जलसंरक्षण व स्वच्छतेबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल सकारात्मक समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जिल्हा परिषद जालना चे पाणी गुणवत्ता तज्ज्ञ श्रीकांत चित्राल यांनी केले. या जिल्हास्तरीय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पाणी गुणवत्ता, स्वच्छता आणि आरोग्य यांच्यातील परस्परसंबंधाविषयी मोलाची माहिती मिळाली.

मुख्याध्यापक व शिक्षकांची उपस्थितीया शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाला स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस. सोनवणे, पर्यवेक्षक आर. ए. जयरंगे, तसेच सहशिक्षक व्हि. के. जाधव आणि एस. बी. जिगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमध्ये पाणी गुणवत्ता, स्वच्छता आणि आरोग्य याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी शालेय व्यवस्थापनाने या उपक्रमाला विशेष सहकार्य केले.भूवैज्ञानिकांकडून मानके व आरोग्यावरील परिणामांचे सादरीकरण

या प्रसंगी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचे सहाय्यक भूवैज्ञानिक सीएच गिरधरा, श्रीकृष्ण देशपांडे, कनिष्ठ भूवैज्ञानिक संदीप शिरसाट आणि मोहसीन शेख यांनी विशेष सादरीकरण केले. त्यांनी विद्यार्थ्यांना दूषित पाण्यामुळे होणारे जलजन्य आजार आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा, याविषयी अत्यंत सविस्तर माहिती दिली. पाण्याचे नमुने तपासताना कोणकोणते घटक भारतीय मानक IS 10500:2012 मधील मर्यादांशी पडताळले जातात, याची तांत्रिक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या मानकापेक्षा घटकांचे प्रमाण कमी-अधिक झाल्यास त्याचे मानवी आरोग्यावर कोणकोणते गंभीर परिणाम होऊ शकतात, हे तज्ज्ञांनी सोप्या भाषेत स्पष्ट केले.जैविक व रासायनिक तपासणीचे थेट प्रात्यक्षिक

या उपक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष प्रात्यक्षिके ठरली. प्रयोगशाळा तज्ज्ञ राहुल भवाळ, राजश्री घाटोळे व गणेश शेळके यांनी विद्यार्थ्यांना पाण्याच्या रासायनिक व जैविक तपासणीचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या विविध अत्याधुनिक उपकरणांची कार्यपद्धती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून त्यांची माहिती दिली. या प्रत्यक्ष अनुभवामुळे विद्यार्थ्यांना पाण्याचे शुद्धीकरण आणि चाचणी प्रक्रिया जवळून अनुभवता आली.

*****

संबंधित पोस्ट

करवंड येथे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी गुणवंताबाई विवाह सोहळा उत्साहात संपन्न;किल्ल्याच्या पुनरुज्जीवनासाठी शासन स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा प्रशिक्षण १० ऑगस्टपासून 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी घेणार शासकीय जनसंवाद कार्यक्रमातील अनुपालनाचा आढावा

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित पवित्र हेमकुंड साहिबचे दरवाजे उद्या भाविकांसाठी उघडण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

शिवसेना पक्षाचे सर्वोच्च मुख्य नेते,राज्याचे कार्यतत्पर,लोकप्रिय उपमुख्यमंत्री ना. एकनाथ संभाजी शिंदे यांच्याहस्ते शिवसेना पक्ष संघटनेमधे डॉ. संजय लाखे पाटील यांच्यावर सोपवलेली जबाबदारी..

गडचिरोली येथील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (#आयटीआय) येथे राबविण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप