vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा प्रशिक्षण १० ऑगस्टपासून 

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा प्रशिक्षण १० ऑगस्टपासून

 

लातूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत कार्यरत गट ‘क’ संवर्गातील लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र गट ‘क’ संवर्ग/लेखा लिपीक पर्यवेक्षीय प्रशिक्षण १० ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणात लेखा, वित्तीय कामकाज तसेच शासनाच्या विविध संगणक प्रणालींशी संबंधित विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणाचा सविस्तर अभ्यासक्रम छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड आणि धाराशिव येथील जिल्हा कोषागार कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

प्रशिक्षणासाठी इच्छुक शासकीय कर्मचाऱ्यांनी संबंधित कार्यालय प्रमुखांचे शिफारसपत्र जोडून आवेदनपत्र विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडे सादर करावे. गट ‘क’ संवर्गातील इच्छुक तसेच नवनियुक्त कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जाणार असून, विशिष्ट मॉड्यूलसाठी स्वतंत्र प्रवेशाची सुविधाही उपलब्ध आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील गट ‘क’ तसेच लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणासाठी नामनिर्देशित करावे, असे आवाहन विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; रविवारी (दि.१२) आकाशवाणीवर जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची विशेष मुलाखत

संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवीन ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहान येथे भूखंडाचे वितरण

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईतील धक्कादायक बातमी -नवी मुंबईतील तळोजा येथे २.५ वर्षांच्या हर्षिका शर्माची तिच्या शेजारीनेच केली हत्या…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्रंथालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाचे उद्घाटन, वाचनीय ग्रंथांच्या मेजवानीचा वाचकांनी लाभ घ्यावा..

नमुंमपा सर्वसाधारण सभेने मंजूर केला सन 2026-27 वर्षाचा 6904.43 कोटी रक्कमेचा नवी मुंबईच्या शाश्वत विकासाचा अर्थसंकल्प…

ठाणे येथील कोलशेत खाडी येथे अनधिकृत रेती उत्खनन करणारे 1 बार्जेस व 2 सक्शन पंप नष्ट