vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; रविवारी (दि.१२) आकाशवाणीवर जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची विशेष मुलाखत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; रविवारी (दि.१२) आकाशवाणीवर जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांची विशेष मुलाखत

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना शासनाने जाहीर केली असून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रशासकीय उपाययोजना सुरु झाल्या आहेत.या योजनेची सविस्तर माहिती देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक(सहकारी संस्था) समृत जाधव यांची विशेष मुलाखत आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन रविवार दि.१२ रोजी सकाळी ८ वा. ४० मि. नी प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत समृत जाधव यांनी या योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली आहे. त्यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी बातचीत केली आहे.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे कार्यक्रम अधिकारी सुजीत बनसोडे हे या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ही मुलाखत अत्यंत उद्बोधक व माहितीपुर्ण असून शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती प्रक्रिया जाणून घेण्यासाठी अवश्य ऐकावी. श्रोत्यांना एफ.एम. 101.7 Mhz या वाहिनीवर ही मुलाखत ऐकता येईल आणि News on AIR ॲप वर ही मुलाखत देशभरात कोठेही ऐकता येणार आहे.

०००००

संबंधित पोस्ट

मुंबई शहर व उपनगरात म्हाडाच्या जागांवरील अनधिकृत बांधकाम;चौकशी करून कारवाई होणार- मंत्री उदय सामंत

मुंबईतील नागरिक कामे पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. पावसाळापूर्व तयारी प्रभावीपणे करून त्यावर अंमलबजावणी करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले. 

यशेादा पॉलिटेक्निक कॉलेज सातारा येथे कायदेशीर जनजागृती कार्यक्रम संपन्न

जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१ गावांसाठी ५८ विंधण विहिरी व १० कुपनलिकांना प्रशासकीय मंजुरी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आदेश; कामे ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना

कृष्णा, कुडाळी व वसना नदीमधून पाणी उपसा करण्यास बंदी

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न !