vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिवकालीन वारसा पर्यटनाला मिळणार नवी ओळख**किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीरजीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार* *प्रथम टप्प्यात १ कोटींचा निधी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई*

*शिवकालीन वारसा पर्यटनाला मिळणार नवी ओळख**किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीरजीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार* *प्रथम टप्प्यात १ कोटींचा निधी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई*

*मुंबई, प्रतिनिधी:* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयातून किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी प्रथम टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भातील निवेदन पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत सादर केले.मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अलीकडील महाबळेश्वर दौऱ्यादरम्यान विविध शिवप्रेमी संघटनांनी वीरजीवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पर्यटन विभागामार्फत प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे शौर्य, स्वाभिमान आणि त्यागाचे प्रतीक आहे. प्रतापगडाच्या ऐतिहासिक लढाईत वीर जीवाजी महाले यांनी समयसूचकता, धाडस आणि पराक्रमाचे दर्शन घडवत छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. “होता जीवा म्हणून वाचला शिवा” ही इतिहासात अजरामर झालेली उक्ती त्यांच्या अतुलनीय शौर्याची साक्ष देणारी आहे.

किल्ले प्रतापगडावर दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी तसेच देश-विदेशातील पर्यटक प्रतापगडाला भेट देतात. त्यामुळे प्रतापगडाचे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व सातत्याने वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वीर जीवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्था, इतिहास संशोधक, शिवप्रेमी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून होत होती. शासनाने या मागणीची दखल घेत पर्यटन विभागाच्या जागेवर भव्य व आकर्षक स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकल्पासाठी प्रथम टप्प्यात एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे, या मुळे किल्ले प्रतापगड हेकेवळ ऐतिहासिक स्थळ न राहता शिवकालीन वारसा पर्यटन क्षेत्रातील एक महत्वपूर्ण आकर्षण म्हणून विकसित होण्यास मदत होणार आहे. किल्ले प्रतापगड येथील वीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाची गाथा राज्यातली तमाम शिवप्रेमींना अखंड प्रेरणेचा स्त्रोत ठरणार असल्याचेही मंत्री श्री. देसाई म्हणाले.या निर्णयामुळे इतिहास प्रेमी, शिवप्रेमी, विविध नागरिक, संघटना, संशोधक, अभ्यासक यांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावीत,भुयारी मार्गानजीक असलेल्या रस्त्यांसाठी २१ कोटींची तरतूद,गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार,मुंबई-गोवा महामार्गाची उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी राज्यस्तरीय समिती..

जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतक-यांनी डाउनलोड केले महाविस्तार AI अप कराड तालुका राज्यात प्रथम ३०,००० शेतक-यांनी केले ॲप डाउनलोड*

महाडीबीटी पोर्टलवरून प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

रॅगिंगविरोधी कायद्यासह विविध कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती

देशाच्या अन्नसुरक्षेसाठी कृषी संशोधन आणि अनुभवाधारित शिक्षणाला चालना देणे काळाची गरज – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर*प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे संशोधन प्रकल्पांची पाहणी; विद्यार्थी, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांशी साधला संवाद*

महसूल विभागाच्या सेवांसाठी आता ‘सुलभ सेवा’ व्हॉट्सॲप चॅटबॉट जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांची संकल्पना