vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकिया सुरु 

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रकिया सुरु

 

जालना, प्रतिनिधी- इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांना दि.25 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहेत.

या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शहरात उच्च शिक्षणासाठी निवासाची सोय उपलब्ध करून देणे हा आहे. जालना महापालिका हद्दीपासून 10 कि.मी. अंतराच्या परिसरातील महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावा तर इतर तालुक्याच्या ठिकाणावरील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यांसारख्या पर्यायी योजनेसाठी अर्ज करावेत. असे आवाहन, सहायक लेखाधिकारी, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

ग्रामपंचायत निवडणूक : मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात २० गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट कामांना मंजुरी१०५.३१ लाख रुपयांच्या १२७ उपाययोजनांना प्रशासकीय मान्यता..

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने नियोजन करणे आवश्यक—-जिल्हाधिकारी किशन जावळे*

पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागातील-सहायक आयुक्त पदाच्या 311 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू· पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे ठोस निर्णय..

vishwatmaklokswamivarta

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान,जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी अभियानाचा लाभ घ्यावा

लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना वेळेत सेवा द्या – आयुक्त डॉ. किरण जाधव-सर्व विभागांनी सेवा ऑनलाईन करण्यावर भर द्यावा

vishwatmaklokswamivarta