vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाबळेश्वर, माथेरानमधील इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे · अटींचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

महाबळेश्वर, माथेरानमधील इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे · अटींचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

मुंबई, प्रतिनिधी : पुणे व कोकण विभागातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांतील शासकीय भाडेपट्टा जमिनींवर अटींचा भंग करून झालेल्या अनधिकृत बांधकामांची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून, महाबळेश्वर आणि माथेरान येथील इको-सेन्सिटिव्ह क्षेत्रातील नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या जमिनी कोणत्याही परिस्थितीत वर्ग-१ (फ्री होल्ड) करण्यात येणार नाहीत, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले
मंत्री बावनकुळे म्हणाले या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात येणार असून, समितीचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर केला जाईल.
महाबळेश्वर येथील २६ भाडेपट्टा जमिनी ८ फेब्रुवारी २०२२ रोजी वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यात आल्या होत्या. या निर्णयामुळे पर्यावरणास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. कायदा व न्याय विभाग तसेच पर्यावरण विभागाने आक्षेप नोंदविल्यानंतर शासनाने या प्रकरणाचा आढावा घेत समिती स्थापन केली आणि संबंधित निर्णय रद्द केला असल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले.
या प्रकरणासंदर्भात काही याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित असून पुढील सुनावणी ४ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. शासन न्यायालयात प्रभावीपणे आपली बाजू मांडून सार्वजनिक हित आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक ती भूमिका घेईल, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना पर्यटन सुविधांची माहिती देण्याचे आवाहन**महाबळेश्वर येथे आयोजित महापर्यटन उत्सव-२०२५ चा शानदार समारोप*

उत्तराखंड 🌧️: रुद्रप्रयाग, चमोली आणि बागेश्वर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे ५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण अद्याप बेपत्ता जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन संघ बचाव व मदत कार्यात व्यस्त आहेत.पाऊस आणि भूस्खलनामुळे या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन जीवन गंभीरपणे प्रभावित…

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार थांबण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांनी डेहराडून येथे उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याची झलक केली सामायिक

vishwatmaklokswamivarta

मुंबई जिल्ह्यात ६८६ रुग्णांना सुमारे ६.५५ कोटींची मदत· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

*श्री तुळजाभवानीदेवीच्या ४ हजार एकर जमीन महाघोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश !* – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पाठपुराव्याला यश…