vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

संत मुक्ताई पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग सज्ज• उपचार केंद्रे, रुग्णवाहिका व फिरती वैद्यकीय पथके तैनात,अंढेरा फाटा ते देऊळगाव माहीदरम्यान व्यापक आरोग्य सुविधा; आपत्कालीन सेवांसह रोगप्रतिबंधक उपाययोजनांवर भर..

संत मुक्ताई पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग सज्ज• उपचार केंद्रे, रुग्णवाहिका व फिरती वैद्यकीय पथके तैनात,अंढेरा फाटा ते देऊळगाव माहीदरम्यान व्यापक आरोग्य सुविधा; आपत्कालीन सेवांसह रोगप्रतिबंधक उपाययोजनांवर भर..

 

बुलढाणा प्रतिनिधी): आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत मुक्ताई पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अखंड, तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले आहे. अंढेरा फाटा ते देऊळगाव माही या पालखी मार्गावर आरोग्य उपचार केंद्रे, रुग्णवाहिका, फिरती वैद्यकीय पथके, आरोग्यदूत, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच रोगप्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या नियोजनानुसार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सदानंद बन्सोड यांच्या सूचनेनुसार संपूर्ण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

पालखी मार्गावरील आरोग्य पथकांकडून वारकऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी, आवश्यक औषधोपचार, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच उष्माघात, संसर्गजन्य व पाणीजन्य आजारांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देता यावा यासाठी रुग्णवाहिका आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचारीही सज्ज ठेवण्यात आले आहेत.

या सेवेमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. मयुरी पाडुळे, समुदाय आरोग्य अधिकारी वैभव लहाने, डॉ. सीमा जाधव, तालुका आरोग्य सहाय्यक प्रभाकर लबडे, गजानन नागरे, शिवाजी वाघ, यश चांदुरे, सुयश वाघमारे, अंकुश डोके, विजय झिने, आरोग्य सेविका संगीता पराड, ॲम्बुलन्स चालक देवानंद खराडे तसेच आशा स्वयंसेविका वर्षा नागरे प्रत्यक्ष पालखी मार्गावर कार्यरत असून वारकऱ्यांना आवश्यक आरोग्य सेवा पुरवत आहेत.

वारकऱ्यांना सुरक्षित, निरोगी आणि सुखकर वारीचा अनुभव मिळावा, यासाठी आरोग्य विभागाकडून सर्व आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्र या अभिनव प्रकल्पाचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले राष्ट्रीय परिषदेत प्रभावी सादरीकरण

डॉक्टर व कर्मचारी यांना निवास सुविधा देण्यासाठी कालबद्ध आराखडा- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

असंसर्गिक आजार अंतर्गत कॅन्सर व्हॅनमध्ये 627 नागरिकांनी घेतला तपासणीचा लाभ

राष्ट्रीय उपशामक काळजी जनजागृती मोहिमेंतर्गत वृद्धांसाठी आरोग्य शिबिर संपन्न…

vishwatmaklokswamivarta

🏥📊 आरोग्य कार्यक्रम अंमलबजवनी निर्देशकामध्ये गडचिरोली जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानी

नांदेडमध्ये पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ; ३ लाख ८८ हजार बालकांना संरक्षणात्मक डोस देण्याचे उद्दिष्ट