vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावासाठी टँकर मंजूर

पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावासाठी टँकर मंजूर

बुलढाणा प्रतिनिधी: पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.

अंढेरा येथे 3932 पशुधन व 8870 लोकसंख्येसाठी तीन टॅंकरद्वारे 2 लाख 45 हजार 635 लिटर्स पाणी पुरवठा दररोज करणार आहेत. पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

संबंधित पोस्ट

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून टोयोटा उभारणार बिडकीन येथे शाळा..

भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा…

दशसुत्रीची सिद्धता;जंगलातांडा येथील विद्यार्थ्यांनी चटकन सोडविले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले गणित..

अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी जनजागृती व प्रत्यक्ष कारवाईवर भर द्या- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांची शोकसंवेदना

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण*