vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

लातूर येथे १० एप्रिल रोजी ‘मार्जिन मनी’ योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन

लातूर येथे १० एप्रिल रोजी ‘मार्जिन मनी’ योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन

लातूर, प्रतिनिधी: केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मार्जिन मनी’ योजनेची सविस्तर माहिती देण्यासाठी लातूरमध्ये विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून ही कार्यशाळा १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लातूर समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयातील सभागृहात होईल.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये मार्जिन मनी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ९ डिसेंबर २०२० रोजी मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या असून, अधिक माहितीसाठी इच्छुक नागरिक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शासन निर्णयाचे अवलोकन करू शकतात.

मार्जिन मनी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तींची पूर्तता करून आपले प्रस्ताव ३० एप्रिल २०२६ पूर्वी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, लातूर येथे सादर करणे आवश्यक आहे. १० एप्रिल रोजी आयोजित या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त इच्छुक लाभार्थ्यांनी सहभागी होऊन योजनेची माहिती घ्यावी, असे आवाहन

संबंधित पोस्ट

विविध कृषी पुरस्कार सन-2023 करिताशेतकरी, गट, संस्था, व्यक्तींनी प्रस्ताव सादर करावेत..

पालकमंत्री अजित पवारांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळेबीड येथे ‘सीट्रिपलआयटी’ उभारणीच्या कामाला गती बीडमधील ‘सीट्रिपलआयटी’साठी एमआयडीसीकडूनचार हजार चौरस मीटर जागा व निधी देण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार 

राष्ट्रीय लोकअदालतीत ९७ लाखांहून अधिक रकमेची वसुली; १०० प्रलंबित आणि २२ दाखलपूर्व खटले निकाली

भारत – पोर्तुगाल पुनर्प्रस्थापित राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण महाराष्ट्रासोबत सहकार्य वाढविण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक- राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा

जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

दुर्गम भागातील वीज वितरण योजनांना गती द्या – जिल्हाधिकारी

vishwatmaklokswamivarta