vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यशस्वी होण्यासाठी निरंतर वाचन आवश्यक- कुंडलिकराव अतकरे

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यशस्वी होण्यासाठी निरंतर वाचन आवश्यक- कुंडलिकराव अतकरे

 

छत्रपती संभाजीनगर, )- जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी निरंतर वाचन आवश्यक असुन शासकीय विभागीय ग्रंथालयातील ग्रंथांचे दालन सर्वांसाठी खुले असुन नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन मराठी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष कुंडलिकराव अतकरे यांनी केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त समर्थनगर येथील शासकीय विभागीय ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे कार्यक्रमप्रसंगी उदघाटक म्हणून अतकरे बोलत होते. अध्यक्षस्थानी सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह गुलाबराव मगर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, देवगिरी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्रीमती वनिता निकम,जीवन कुलकर्णी व देवगिरी हायस्कूलचे शिक्षक कोलते उपस्थित होते.

मातृभाषेचा संस्कार व्यक्तीच्या अंतःकरणात खोलवर रुजलेला असतो.आनंद व दुःखासारख्या तीव्र भावना अनुभवताना मुखातून बाहेर पडलेले उद्गार हे मातृभाषेतीलच असतात.मराठी शब्दसाठा वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील ग्रंथांचे वाचन करण्याचे आवाहन सुनील हुसे यांनी केले.

प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री संतोष जाधव यांनी केले.सुत्र संचालन व आभार प्रदर्शन तांत्रिक सहाय्यक गोविंद खेडकर यांनी केले.शिक्षकवृंद व विद्यार्थी, विभागीय ग्रंथालयाचे सभासद,वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाअखेर उपस्थित विद्यार्थ्यांनी सामुहिक ग्रंथ वाचन केले.

ग्रंथप्रदर्शन दि.२८ तारखे पर्यंत सर्वांसाठी खुले असुन नागरिकांनी या ग्रंथप्रदर्शनाला भेट द्यावी व शासकीय विभागीय ग्रंथालयाचे सभासद होऊन येथील वाचन सुविधेचा लाभ घेण्याविषयी आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षांसाठी बसणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत एक वर्षाची विशेष शिथिलता देण्याचा निर्णय..

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणाच्या हानीने मनुष्य जीवाला धोका

हिंद-दी-चादर’कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात -आमदार बाबुसिंगजी महाराज

एसआयआर अंतर्गत मतदार गणनाअर्ज दाखल करण्याची 17 ऑगस्टपर्यंत शेवटची संधी

धारावी वॉर्ड १८५ मध्ये तिकीट नाकारल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी दादर कार्यालयात गोंधळ घातला

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन करावे – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर