vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांचीत्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांचीत्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:-जिल्ह्यातील शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे) कायदा, 1959 व नियम 1960 च्याकलम 5 (1) अन्वये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना तसेच कलम 4 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या मनुष्यबळाची (पुरुष-स्त्री) दर तिमाही (मार्च/जून/सप्टेंबर/डिसेंबर) अखेरची माहिती शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करावी, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम. अ.मु.पवार यांनी कळविले आहे

त्यानुषंगाने आपल्या आस्थापनेची माहे डिसेंबर,2025 अखेर संपणाऱ्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक विवरणपत्र आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Employment या टॅबवरील Employer (List a Job) याला क्लीक करुन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरुन लॉगिन करावे लॉगिन झाल्यावर आपल्या आस्थापनेची माहिती अद्ययावत करुन ER-1 वर क्लिक करावे Enter ER-1 याद्वारेú आपल्याकडील अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. हे त्रैमासिक विवरण पत्र सादर करण्याचा कालावधी दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी, 2026 आहे, याची सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे प्रत्येक आस्थापनेने आपल्या आस्थापनेचा नोंदणी तपशील (Employer Profile) देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्यावत करावी, या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा युजर आयडी/पासवर्ड याबाबत माहिती आवश्यक असल्यास या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर – 02141-222029 अथवा या कार्यालयाचे लिपिक-टंकलेखक श्री. म.भा.वखरे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9421613757 वर संपर्क साधल्यास आपणास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

 

0000000

संबंधित पोस्ट

अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवारी फोस्टेक प्रशिक्षण;हॉटेल, केटरींग व्यवसाय चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना :कृत्रिम फुलांवर बंदीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार- फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविले

तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याण योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागाची वृक्ष लागवड मोहीम..

महिलांसाठी 23 मार्चला विशेष रोजगार मेळावा