vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

शिवसाई आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ;डेंग्यू, हिवताप प्रतिबंधाबाबत जनजागृती; स्वच्छता व वैयक्तिक आरोग्याबाबत मार्गदर्शन

शिवसाई आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ;डेंग्यू, हिवताप प्रतिबंधाबाबत जनजागृती; स्वच्छता व वैयक्तिक आरोग्याबाबत मार्गदर्शन

बुलढाणा, प्रतिनिधी : जानेफळ येथील शिवसाई आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत दि. 30 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूरज ठाकरे व वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोंळकी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने ही तपासणी केली.

तपासणीदरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांच्या रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. तपासणीमध्ये आढळून आलेल्या बाबींची नोंद घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य, संतुलित आहार तसेच विविध आजारांपासून बचावाच्या उपाययोजनांबाबत आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंग्यू व हिवतापापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली. परिसरात स्वच्छता राखणे, पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती रोखणे तसेच आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी व आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास आजारांचे वेळीच निदान आणि प्रतिबंध करणे शक्य होते. या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य तपासणी उपक्रमास विद्यार्थी, शिक्षक तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

00000

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात १४ वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम९ मार्चपासून सुरुवात

कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक तपासणी प्रतिबंधात्मक उपचार व डिजिटल नोंदणीवर भर

vishwatmaklokswamivarta

हरीसाल आरोग्य केंद्राच्या पथकाकडून मातेला जीवनदान*प्रसूतीनंतरचा गंभीर रक्तस्त्राव रोखण्यात यश…

vishwatmaklokswamivarta

जागतिक कावीळ दिनानिमित्त जालना शहरात जनजागृती रॅली

सांगली जिल्ह्यात २००८ रुग्णांना सुमारे १४.४० कोटींची मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

निरोगी वृद्धत्वासाठी योग’ – यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची संकल्पना लोकांच्या दीर्घायुष्‍य आणि निरामयतेप्रति समग्र दृष्टीकोन अधोरेखित करते“योग आपल्याला सन्मानपूर्वक जगण्‍यासाठी वृद्धापकाळात निरोगी राहण्‍याची कला शिकवतो”: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव