जालना जिल्हा ग्राहक पंचायतच्या अध्यक्षपदी मोहन इंगळे यांची फेरनिवड संघटकपदी शिवाजी वाघ तर सचिवपदी सुनील मावकर
जालना (प्रतिनीधी) जालना जिल्हा ग्राहक पंचायत नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून त्यात अध्यक्षपदी मोहन इंगळे यांनी फेरनिवड करण्यात आली तर संघटकपदी शिवाजीराव वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जालन्यात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक पंचायतच्या जिल्हास्तरीय बैठकीत प्रथम ग्राहक तीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने जालना जिल्हा ग्राहक पंचायतची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.मोहन इंगळे यांनी मागील कालावधीत विविध उपक्रम राबवत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मोहन इंगळे यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. तर उर्वरित कार्यकारिणी मध्ये संघटकपदी शिवाजीराव वाघ, सहसंघटक शंकरराव संवादे, सौ.रुचिता सेवलीकर, सचिव डॉ.सुनील मावकर, सहसचिव नंदकुमार देशपांडे, कोषाध्यक्ष आर.आर.जोशी, उपाध्यक्ष दिलीप लाड, प्रसिध्दीप्रमुख अहेमद नुर, कार्यकारिणी सदस्य गणेश थोरात, सौरभ पंच यांचा नवीन कार्यकारिणीत समावेश असून नूतन पदाधिकाऱ्यांच्या या निवडीचे जिल्हा बैठकीत स्वागत करून त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला