vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शतायुषी शिक्षणव्रतीचा गौरव–ग्रंथतुला आणि धान्यतुला करून जपली सामाजिक बांधिलकी…

शतायुषी शिक्षणव्रतीचा गौरव–ग्रंथतुला आणि धान्यतुला करून जपली सामाजिक बांधिलकी…

ठाणे प्रतिनिधी-ठाणे गौरव पुरस्काराने सन्मानित शिव समर्थ विद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षिका आणि श्री समर्थ सेवक मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या श्रीमती लीला श्रोत्री यांनी 2 एप्रिल 2026 रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने संस्थेच्या वतीने त्यांचा ५ एप्रिल रोजी गौरव सोहळा श्री हनुमान व्यायाम शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता.

२२ वर्षाच्या सेवेनंतर जरी श्रोत्रीबाई निवृत्त झाल्या असल्या तरी आजतागायत बाह्य परीक्षा, विविध उपक्रम, संस्कृत शिक्षण, गरीब विद्यार्थ्यांना मदत अशा विविध बाबींमधून त्या अजूनही संस्थेत आणि शाळेत सक्रिय आहेत. विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती असून विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या आहेत. वयाच्या शंभरीतही सक्रीय असणाऱ्या अशा प्रेरणादायी ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला मानवंदना देण्यासाठी श्री समर्थ सेवक मंडळाने हा देखणा सोहळा आयोजित केला होता.

फुलांच्या वर्षावात व लेझीमच्या खणखणाटात उत्सव मूर्ती श्रोत्री बाईंचे आगमन झाले. अतिशय प्रसन्नपणे स्वागत स्वीकारून बाई व्यासपीठावर स्थानापन्न झाल्या. त्यानंतर श्री समर्थ सेवकंडळातर्फे त्यांची धान्य तुला करण्यात आली. तर माजी विद्यार्थी आणि हितचिंतकांनी दान केलेल्या पुस्तकांनी बाईंची ग्रंथ तुला करण्यात आली. सदर धान्य आणि पुस्तके आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दान करण्यात येणार आहेत. मंडळाचे शास्ता डॉ. चैतन्य साठे आणि कार्यकारी विश्वस्त जयेश सोहनी यांनी बाईंचा भेटवस्तू, मानपत्र देऊन सत्कार केला.व्यासपीठावर शंभर दिव्यांनी बाईंचे औक्षण करण्यात आले.

मंडळाचे शास्ता डॉ. चैतन्य साठे कार्यकारी विश्वस्त जयेश सोहनी,विश्वस्त श्री उल्हास प्रधान, जेष्ठ सभासद श्री प्रफुल्ल प्रधान यांनी मंडळातर्फे आपले मनोगत व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा ओक यांनी सुंदर शब्दात मांडले. श्रोत्रीबाईंची कन्या श्रीमती अंजली सुळे तसेच पणतू स्मित , देशपांडे भावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाईंचे विद्यार्थी श्री. शरद राईलकर, श्री. अतुल दोंदे, श्री. आनंद शिंदे , श्रीमती मीनल महिमकर सातघरे यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. सत्काराला उत्तर देताना उपस्थितांशी संवाद साधत आपल्या निरोगी जीवनशैलीचे मर्म उलगडून दाखवले. आपल्या मनोगतात बाईंनी आपला जीवन प्रवास उलगडून सांगितला गुरुवर्य कै. स.वि.कुलकर्णी कै. लागू गुरुजी यांनी मला घडवलं हे सांगताना आजही त्यांचा स्वर हळवा झाला होता तसेच कै. तात्या साठे कै. नाना साठे यांच्या बद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शैला भाटवडेकर व पौर्णिमा जोशी यांच्या निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. स्मिता जोशी यांनी केलेल्या आभार प्रदर्शनानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. श्री समर्थ सेवक मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद, संस्थेच्या चारही शाळांतील आजी-माजी शिक्षक, सहकारी, माजी विद्यार्थी तसेच बाईंचे नातेवाईक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. बाईना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली होती.

 

संबंधित पोस्ट

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा राष्ट्रीय नमुना पाहणीची ७५ वर्षे ही मध्यवर्ती संकल्पना

तृतीयपंथीयांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन  : सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर

मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी- हवामान खात्याकडून कडून यलो अलर्ट जारी…

म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटरचे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी पीककर्ज व किसान क्रेडीट कार्डसाठी ‘जनसमर्थ’ पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करावेत  -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta