vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीतातील एक सुवर्ण पर्व संपले – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीतातील एक सुवर्ण पर्व संपले – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई द प्रतिनिधी:- ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील एक देदिप्यमान सुवर्ण पर्व संपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, स्वरांमधून भावना व्यक्त करण्याची विलक्षण ताकद लाभलेला एक अमूल्य आवाज आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मराठी भावगीत, भक्तीगीत, बालगीत तसेच हिंदी चित्रपट संगीताच्या विश्वात सुमनताईंनी आपला अजरामर ठसा उमटवला. त्यांच्या सुरेल आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने अनेक पिढ्यांचे भावविश्व समृद्ध केले आणि जगभरातील संगीतप्रेमींच्या हृदयात कायमचे हक्काचे स्थान निर्माण केले. साधेपणा, नम्रता आणि संगीताप्रती असलेली निष्ठा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती.त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामतीतील काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. थोड्याच वेळात त्यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी करण्यात येणार आहे.

vishwatmaklokswamivarta

मागासवर्गीय, दिव्यांग व्यक्तिंनी घरकुल योजनेच्या,लाभासाठी पंचायत समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पाणी बचत व पर्यायी पाण्याच्या प्रभावी वापराबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन*

मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’ चे आयोजन’पल्स’ परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील कुपोषण नियंत्रणासाठी उपाययोजना करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे