vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.सुभाष सावरकर यांना श्रद्धांजली

अक्षरवैदर्भी’चा आधार, जनसाहित्य चळवळीचा अध्वर्यू निमाला-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.सुभाष सावरकर यांना श्रद्धांजली..

मुंबई, प्रतिनिधी- जनसाहित्य चळवळीचे अध्वर्यू आणि ‘अक्षरवैदर्भी’ चे आधारस्तंभ ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.सुभाष सावरकर यांच्या निधनामुळे मराठी जनसाहित्य चळवळ पोरकी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, प्रा. डॉ. सावरकर यांनी जनसाहित्य चळवळीचा प्रवाह निर्माण केला. यातून त्यांनी समीक्षा- संशोधनाला चालना देणारे शोधप्रकल्प जाणीवपूर्वक राबविले. डॉ. सावरकर अभियांत्रिकी क्षेत्रातून आले. पण त्यांनी ‘अक्षरवैदर्भी’च्या माध्यमातून जनसाहित्याचा विचार आणि चळवळीला प्रोत्साहन दिले. या वाटचालीत त्यांनी आशयघन आणि वैविध्यपूर्ण साहित्यकृतींची निर्मिती केली. विशेषतः १२ समीक्षा ग्रंथ सिद्ध केले. त्यांच्या ‘संतवाङ्मयाचे जनसाहित्य मूल्य’, आणि ‘जनभाषेच्या शोधात’ या ग्रंथाना पुरस्कार देखील मिळाले. जनसाहित्य विषयावर सातत्यपूर्णरित्या राष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन तसेच राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनांसारख्या महत्वपूर्ण आणि अभिनव उपक्रमांची त्यांनी साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली. त्यांच्या निधनामुळे जनसाहित्य चळवळ पोरकी झाली आहे. पण त्यांचे कार्य ‘अक्षरवैदर्भी’ च्या रुपाने सदैव दिपस्तंभासारखे मार्गदर्शन करत राहील. डॉ. सावरकर यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते व कुटुंबियांना झालेल्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ प्रा. सुभाष सावरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र हे व्यवसायासाठी सर्वोत्तम ठिकाण; स्वीडिश कंपन्यांना धोरणात्मक पाठबळ देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वीडिश कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत राऊंडटेबल चर्चा

24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन

महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या वन स्टॉप क्रायसिस सेंटर (सखी केंद्र) तसेच शासकीय महिला आधारगृहांमधील सेवांचा, सखी केंद्रे आणि महिला आधारगृहांमधील निवारा, कायदेशीर मदत, आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व समता पंधरवड्यानिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिमेचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

नवीन क्रिकेट मैदानासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला मदत करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे मैदानावरील भव्य सोहळ्यात स्टँडला रोहित शर्मा यांचे नाव

vishwatmaklokswamivarta

रोहणवाडी येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या : ज्ञानेश्वर उगले यांची मागणी

vishwatmaklokswamivarta