vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण दि.१६ पासून

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण दि.१६ पासून

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने दि.१६ ते २३ दरम्यान आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रम (Familiarization Exercise) आयोजित करण्यात आला आहे,असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विनोद खिरोळकर यांनी कळविले आहे.

प्रशिक्षणाचे वेळापत्रक व समन्वयकांचा संपर्क याप्रमाणे-

१. बुधवार दि.१६- सरस्वती भुवन शिक्षण संस्था, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर,मंगेश डोलारे (मो. 9764798524)

२. गुरुवार दि.१७- जि. प्र. प्रशाला, गणोरी, ता. फुलंब्री,अनिल देशमुख (मो. 9226966376)३. सोमवार दि.२१- जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, दीपक उदावंत (मो. 7058010450)४. मंगळवार दि.२२- तहसील कार्यालय, गंगापूर, पारस पेटारे (मो. 9503496204), शुभम अहिरे (मो. 9545360502)

५. बुधवार दि.२३- तहसील कार्यालय, फुलंब्री, सतिश शिंदे (मो. 9527495315), श्री. हरिदास पांढरे (मो. 8080268047)

त्वरित प्रतिसादासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे

आपत्ती काळात सर्व संबंधित घटकांच्या त्वरीत प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे असते. प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनात कशी भूमिका बजवावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आपत्ती निवारण, बचाव कार्य आणि पुनर्वसन यासंदर्भात NDRF तज्ज्ञांकडून प्रात्यक्षिक आणि सखोल माहिती दिली जाईल.

प्रशिक्षणातील घटक,प्रशिक्षणादरम्यान विविध आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाची तयारी, बचावकार्याचे तंत्र, स्थानिक नागरिकांची सहभागिता आणि तातडीच्या उपाययोजना यावर भर दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने हा उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी संस्थांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग येथे ई-सेवा व नक्कल कॉपी केंद्राचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

धारावीतील संत रोहिदास समाज बांधवांसह भगिनींचा होलिकोत्सव संपन्न..

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्यांची गय नको ; महसूल व पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश-जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचा निपटारा : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन नाथ संप्रदायाचे सर्वसामान्यांशी नाते;मंदिर परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश* *मनुष्य व पशुहानी टाळण्यास द्यावे सर्वोच्च प्राधान्य- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

vishwatmaklokswamivarta