vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग येथे ई-सेवा व नक्कल कॉपी केंद्राचे उद्घाटन

जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग येथे ई-सेवा व नक्कल कॉपी केंद्राचे उद्घाटन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग येथे नागरिकांना व वकिलांना सुलभ, जलद व पारदर्शक सेवा मिळाव्यात या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ई-सेवा व नक्कल कॉपी कार्यालयाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या वेळी श्रीमती सृष्टी नीलकंठ, जिल्हा न्यायाधीश-1, श्रीमती एस.आर.तिवारी, जिल्हा न्यायाधीश-2, तसेच एच. डी. भगत, जिल्हा न्यायाधीश-3, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे उपस्थित होते. याशिवाय जिल्हा न्यायालयातील सर्व माननीय न्यायाधीश, न्यायिक अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

तसेच या कार्यक्रमाला वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रसाद पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड.ए.डी.पाटील,सचिव अ‍ॅड.अमित देशमुख यांच्यासह अनेक ज्येष्ठ व कनिष्ठ वकील, न्यायालय व्यवस्थापक महेश दायमा उपस्थित होते.ई-सेवा व नक्कल कॉपी केंद्राच्या माध्यमातून आता न्यायालयीन कागदपत्रांच्या नक्कल प्रती, अर्ज, विविध सेवा अधिक वेगाने व सुलभ पद्धतीने मिळणार असून नागरिकांचा वेळ व श्रम वाचण्यास मदत होणार आहे. डिजिटल प्रणालीमुळे कामकाजात पारदर्शकता येऊन न्यायप्रणाली अधिक सक्षम होईल असे मत जिल्हाप्रमुख न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी व्यक्त केले.

या उपक्रमामुळे न्यायालयीन कामकाज अधिक आधुनिक,गतिमान व नागरिकाभिमुख होण्यास मोठी मदत होणार असून न्याय प्रक्रियेत विश्वास वाढण्यास हातभार लागेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला

0000000

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर व औसा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, ०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान

vishwatmaklokswamivarta

हज यात्रेकरूंना स्मार्ट वॉच करून देणार- हज यात्रेकरूंचे पहिले विमान 24 एप्रिल ला रवाना होणार

ईडीने ने केरळमधील करूवनूर सर्व्हिस कोऑपरेटिव बँक कर्ज घोटाळ्यात अंतिम आरोपपत्र दाखल केले.

नीट’ परीक्षा सुरळीत…

अकोला जिल्ह्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक झाल्याची माहिती प्राप्त झाल्यास पुन्हा चौकशी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

बंदरे विभागाने लोकाभिमूख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा- बंदरे मंत्री नितेश राणे