vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनीयार यांनी घेतला महानगरपालिका निवडणुकीचा आढावा -जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिली आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती • आचारसंहिता, स्ट्राँग रूम आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत नोडल अधिकाऱ्यांशी साधला संवादमतदान प्रक्रिया निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवा- मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनीयार 

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनीयार यांनी घेतला महानगरपालिका निवडणुकीचा आढावा -जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिली आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती • आचारसंहिता, स्ट्राँग रूम आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत नोडल अधिकाऱ्यांशी साधला संवादमतदान प्रक्रिया निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवा- मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनीयार

            जालना, प्रतिनिधी :- जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीसाठी दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. तरी मतदान प्रक्रिया निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवावे, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनीयार यांनी केले.

       जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, सहाय्यक निवडणूक निरीक्षक हरीश धार्मिक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची उपस्थिती होती.      निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांच्या प्रशिक्षणाबाबत माहिती जाणून घेऊन मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत होण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज राहतील याची दक्षता घेण्याबाबतची सूचना केली. शहरातील मतदान केंद्रावरील व्यवस्था, संवेदनशील मतदान केंद्रावरील व्यवस्था, दिव्यांग मतदारांसाठी व्यवस्था, पाणी, वीज व रॅम्पची व्यवस्था इत्यादी बाबीबरोबरच शस्त्र जमा केल्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. जमा न झालेली सर्व शस्त्रास्त्रे जमा करून घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

      मतदान यंत्र आणि मतदानासाठी यंत्रांची सज्जता याविषयी आढावा घेऊन मतदानानंतर सर्व मतदान यंत्रे जमा करण्याचे व त्याची सुरक्षितता याबाबतही विविध सूचना दिल्या. अवैध दारू विशेषतः निवडणूक काळात अवैध मद्य वाहतूक आणि साठा रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कडक

संबंधित पोस्ट

रासे गृहसंकुल प्रकल्पामुळे आदिवासी कुटुंबाना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा मार्ग सुकर-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ५२ आदिवासी कुटुंबांसाठीच्या गृहसंकुलाचे लोकार्पण

वारणा धरणात 14.59 टी.एम.सी. पाणीसाठा

मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-मराठी भाषा मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते ‘राजमाता महोत्सव’चा शुभारंभ;बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशिल – ना.प्रतापराव जाधव

छत्रपतींच्या जयघोषात, शिवमय वातावरणात भव्य व दिमाखदार“जय शिवाजी जय भारत”पदयात्रा संपन्न

vishwatmaklokswamivarta

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट

vishwatmaklokswamivarta