vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘वन्यवाणी वन्यजीव महोत्सव २०२६’ चा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते शुभारंभ

राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘वन्यवाणी वन्यजीव महोत्सव २०२६’ चा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई प्रतिनिधी-

राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘वन्यवाणी वन्यजीव महोत्सव २०२६’ चा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते शुभारंभ

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात उपक्रम; ‘निवासस्थानांना जोडणे, वन्यजीवांची भरभराट’ या संकल्पनेवर भर विविध संस्थांच्या सहभागातून माहिती प्रदर्शन, कार्यशाळा व व्याख्यानांचे आयोजन

🔷राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात ‘वन्यवाणी वन्यजीव महोत्सव २०२६’ चा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते आज (दिनांक २ ऑक्टोबर २०२६) सकाळी शुभारंभ करण्यात आला.

🔷या शुभारंभप्रसंगी प्राणिसंग्रहालयाच्या उपसंचालक डॉ. (श्रीमती) कोमल राऊळ, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवानंद शिरसाट आणि जीवशास्त्रज्ञ डॉ. अभिषेक साटम आदी मान्यवर उपस्थित होते

🔷“निवासस्थानांना जोडणे, वन्यजीवांची भरभराट” (Connecting Habitats, Thriving Wildlife) या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित हा महोत्सव बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि वन्यवाणी फाउंडेशनच्या संकल्पनेतून व सहआयोजनातून आयोजित करण्यात आला आहे.

🔷भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय हे देशातील जुन्या प्राणिसंग्रहालयांपैकी एक आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण (नवी दिल्ली) यांनी राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय धोरण १९९८ (नॅशनल झू पॉलिसी) मध्ये आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत येथे दुर्मीळ प्राणी व पक्ष्यांचे संवर्धन केले जाते. या शास्त्रीय संवर्धनासोबतच नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी आपुलकी व संवेदनशीलता निर्माण करणे, हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

🔷या महोत्सवाच्या कालावधीत विद्यार्थी व पर्यटकांसाठी दररोज विशेष कार्यशाळा, प्रदर्शन, वन्यजीवांवरील माहितीपट आणि अभ्यासकांची व्याख्याने अशा विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातून पर्यटकांना वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व जाणून घेता येईल

🔷सप्ताहादरम्यान विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून माहिती प्रदर्शन (Information Exhibition Displays) उभारण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, जेन गुडॉल इन्स्टिट्यूट (Jane Goodall Institute), वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी (Wildlife Conservation Society), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (Sanjay Gandhi National Park), सीड स्टोरीज (Seed Stories), ग्रीन वर्क ट्रस्ट (Green Work Trust), सृष्टिज्ञान (Srushtidnyan), गोदरेज, असर, क्लायमेट कल्चर कलेक्टिव्ह, अरेण्य, प्रोजेक्ट मुंबई आणि वनभाषी या संस्था सहभागी झाल्या आहेत.

🔷या प्रदर्शनात सहभागी संस्थांच्या पर्यावरण व वन्यजीव संवर्धनातील प्रत्यक्ष कार्यावर प्रकाश टाकणारी छायाचित्रे, माहिती फलक आणि शास्त्रीय नमुने (Specimens) प्रदर्शित करण्यात आले आहेत. विद्यार्थी, अभ्यासक आणि निसर्गप्रेमींनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

जेईई,नीट,सीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप

मुंबई लोकल बनतेय धर्मांतर आणि भोंदूगिरीचा अड्डा; मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जनआंदोलन !हिंदु जनजागृती समितीचा रेल्वे प्रशासनाला थेट इशारा

वेदांमध्ये समृद्ध जीवनपद्धती सांगणारे ज्ञान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर वेद पाठशाळे’चे उद्घाटन

सिंदखेडराजा येथे ५ जूनला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; बेजगारांसाठी सुवर्णसंधी

जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटरहा महत्वपूर्ण उपक्रम—पालकमंत्री भरतशेठ गोगावले