vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला पोलिसांनी केली अटक, राहत्या घरातच मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या,मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ..

बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाला पोलिसांनी केली अटक, राहत्या घरातच मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या,मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ..

बॉलीवूड प्रतिनिधी- बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांनी दिनो मोरियाला मुंबईतीलराहत्या घरातून अटक केली आहे.

दरम्यान, दिनो मोरियावर यापूर्वी दिशा सालियान प्रकरणातही आरोप करण्यात आलेलं. दरम्यान, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात दिनो मोरियाला ईडी चौकशीलाही सामोरं जावं लागलेलं. तसेच, त्याच्या राहत्या घरी छापेमारीही करण्यात आलेली.

मिठी नदी गाळ उपसा गैरव्यवहार आणि अभिनेता डिनो मोरिया यांचं कनेक्शन मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सफाई कंत्राटातील कथित 65 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफरीच्या तपासाशी संबंधित आहे. अटक करण्यात आल्यानंतर दिनो मोरिया याला अधिक चौकशीसाठी मुंबई पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आज 2 ऑक्टोबर) सकाळपासून दिनो मोरिया याची चौकशी सुरू होती. सुमारे आठ तास चाललेल्या या चौकशीनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलीय.

मिठी नदी गैरव्यवहाराचं प्रकरण,या घोटाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) गाळ काढण्याची यंत्रे आणि गाळ काढण्याची उपकरणे भाड्याने घेण्यामध्ये कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. कोची येथील मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी केलेल्या मशिनरीसाठी कदम आणि सह-आरोपी जय जोशी यांनी महापालिकेकडून जास्त दर आकारल्याचा आरोप करण्यात आलाय.  मॅटप्रॉप अधिकारी आणि बीएमसीच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज (एसडब्ल्यूडी) विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे काम करण्यात आल्याचा तपासकर्त्यांचा अंदाज आहे.

मीठी नदी घोटाळा : बीएमसी, कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा अधिकारी आणि कंत्राटदारांसह एकूण 13 जणांविरोधात मीठी नदी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला

. ED चा संशय आहे की, विशेष ड्रेजिंग उपकरणं भाड्यानं घेण्यासाठी टेंडर प्रक्रियेत छेडछाड करण्यात आली, आणि ठराविक पुरवठादारांना फायदा मिळवून देण्यात आला. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. मीठी नदी, जी मुंबईतून वाहून अरबी समुद्रात मिळते, ही नदी सतत गाळ आणि पुराच्या समस्यांमुळे त्रस्त आहे.

दिनो मोरिया कोण? अक्षय कुमारच्या ‘हाउसफुल 5’ चित्रपटात काम करणारा अभिनेता दिनो मोरिया सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. डिनो मोरियाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.

संबंधित पोस्ट

बुलढाणा जिल्ह्यात ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा होणार शुभारंभ!७ मार्चपासून ते १५ मे २०२६ पर्यंत चालणार अभियान!

केंद्र शासनाच्या योजनांचा केंद्रीय आयुष व कुटूंब कल्याण राज्यमंत्री यांनी घेतला आढावा;योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – ना. प्रतापराव जाधव

खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने …

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देताना नाशिक पोलिसांची तुलना ‘कंसा’शी करू नका ! – हिंदू जनजागृती समिती

२५ जुलै रोजी डोंबिवली मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ शिबीरांचे आयोजन नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी एआय’ला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यावर भर – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे शेती व संलग्न क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला चालना

vishwatmaklokswamivarta