vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनासाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन 

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनासाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

जालना, प्रतिनिधी संत रोहिदास चर्मोउदयोग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार,मोची,ढोर होलार) इ. व्यक्तींचा शैक्षणिक व सामाजिक विकास होण्यासाठी आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये विविध योजना राबविल्या जाणार आहेत. इच्छुकांकडून कर्ज प्रस्ताव दि.11 जून पर्यंत मागविण्यात आले आहेत. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या 50 टक्के अनुदान योजनेसाठी 41, बीजभांडवल योजनेसाठी 20 असे एकूण 61 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

निकषः- अर्जदार हा चर्मकार (चांभार, मोची, ढोर, व होलार) इ. समाजातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष इतके असावे. अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार स्वतः अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून कर्ज प्रस्ताव दाखल करावेत. त्रयस्थ/ मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरणांचे अर्ज देण्यात अथवा स्वीकारण्यात येणार नाही.

आवश्यक कागदपत्रेः- जातीचा दाखला, चालु वर्षाचा उत्पन्नाचा दाखला,रेशन कार्ड,रहिवासी दाखला,मतदान ओळखपत्र, आधारकार्ड,पॅन कार्ड,शैक्षणिक दाखला, तीन फोटो, उद्योग आधार, सीबील क्रेडिट स्कोर (500 च्या पुढे असावा),ज्याठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे त्या जागेचा पुरावा, वीज बील/ टॅक्स पावती /भाडे करारनामा/भाडे पावती/ जागा वापर संमती पत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा,कागदपत्रे खरी असल्याबाबत लाभार्थ्याचा विनंती अर्ज व ज्या जागी व्यवसाय चालु आहे त्याच जागेचे प्रमाणित छायाचित्र, एक सक्षम जामिनदार (नोकरदार/मालमत्ताधारक/शेतकरी),जामिनदाराचे हमीपत्र, ग्रामपंचायत, महानगरपालिका अथवा नगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रीक प्रमाणपत्र, अनुभवाचा दाखला, प्रकल्प अहवाल (सीए यांच्या सही शिक्क्यानिशी),खरेदी करावयाच्या साहित्याचे जीएसटी क्रमांक असलेले दरपत्रक,अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र, विहित नमुन्यातील शपथपत्र, विवाहित स्त्री असल्यास लग्नापुर्वीचे व लग्नानंतरच्या दोन्ही नावाची व्यक्ती हि एकच असल्याबाबतचे शपथपत्र, लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक व आधार संलग्न बँक खाते क्रमांक असलेल्या पासबुकची छायांकीत प्रत.

ज्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेऊन व्यवसायासाठी कर्ज घ्यावयाचे असेल अशा इच्छुकांनी आपले कर्ज प्रस्ताव दि. 11 जून पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्र. 3. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे सादर करावेत. गरजू लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अरुण सी. राऊत यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सांगली शहरातील सत्ता प्रकार रुपांतरीत मिळकत पत्रिका नक्कलचे वितरण…

vishwatmaklokswamivarta

दलित पँथर सारखी पुन्हा तरुणांची फौज उभी करण्याचा माझा प्रयत्न ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजर्षी शाहू महाराज स्मारकासाठी कोल्हापूर महापालिकेला शाहू मिलची जागा देण्यास तत्त्वतः मान्यता वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत बैठक

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन   

दिव्यांग कल्याण विभागातील सर्व रिक्त पदेपुढील तीन महिन्यात भरणार- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे