vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नागपूर मेट्रो टप्पा-२ विस्तारास व सागरी सेतू-वांद्रे किल्ला कनेक्टरला मान्यता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठक

नागपूर मेट्रो टप्पा-२ विस्तारास व सागरी सेतू-वांद्रे किल्ला कनेक्टरला मान्यता.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठक

मुंबई, प्रतिनिधी: नागपूर मेट्रो रेल टप्पा २ अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या दरम्यान विस्तारीत उन्नत मेट्रो मार्गिका उभारण्यास तसेच मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्यासाठी कनेक्टर उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूपासून वांद्रे किल्ल्यापर्यंत अतिरिक्त जोडरस्ता तयार करण्यात येणार आहे. यासाठी १७२२.४० कोटी रुपयांचा प्रस्ताव पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. हा जोडरस्ता सागरी सेतूपासून वांद्रे किल्याजवळ जोडली जाणार असून तो ३.५५ किमी लांबीचा असणार आहे. या कनेक्टरमुळे २० ते ४५ मिनिटांचा प्रवास हा १० मिनिटांपर्यंत येणार आहे. या जोडरस्त्याचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरातील सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्यासाठी नागपूर मेट्रो रेल टप्पा-२ अंतर्गत कन्हान नदी ते कन्हान शहर या उन्नत विस्तारीत मेट्रो रेल्वे मार्गिकेस मान्यता देण्यात आली. ही मार्गिका सुमारे १.४० कि.मी. असून त्यावर १ उन्नत स्थानक असणार आहे. एकूण रु. ३१०.३५ कोटी इतक्या प्रकल्प पूर्णत्व किंमतीच्या या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत करण्यास मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पास केंद्रशासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

००००

संबंधित पोस्ट

कॉर्पोरेट जिहाद’ संदर्भात झारखंडचे राज्यपाल पंतप्रधानांशी चर्चा करणार;हिंदु जनजागृती समितीने दिले निवेदन

सन्माननीय कार्यकर्त्यांच्या उत्साही वातावरणात रामवाडी येथे पार पडली ‘संवाद बैठक’… ✌🏻🪷

vishwatmaklokswamivarta

यूपीआय व्यवहारांची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत

vishwatmaklokswamivarta

नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि टीम नऊ महिन्यांच्या वास्तव्यानंतर पृथ्वीवर,अंतराळयान मेक्सिकोच्या आखातात उतरताच, कॅलिफोर्नियातील स्पेसएक्स मिशन कंट्रोलने त्यांचे स्वागत या संदेशाने: केले ‘स्पेसएक्सच्या वतीने, घरी स्वागत आहे…

अमरावती तालुक्यात ‘फार्मर कप’साठी शेतकरी प्रशिक्षण संपन्न

vishwatmaklokswamivarta

समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर–प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत

vishwatmaklokswamivarta