vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावती तालुक्यात ‘फार्मर कप’साठी शेतकरी प्रशिक्षण संपन्न

अमरावती तालुक्यात ‘फार्मर कप’साठी शेतकरी प्रशिक्षण संपन्न

      अमरावती, प्रतिनिधी : कृषी विभाग, आत्मा आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धेसाठी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण नुकतेच पार पडले. या प्रशिक्षणाला तालुक्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

    प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’ या राज्यव्यापी उपक्रमासाठी सज्ज करणे तसेच पाणी फाउंडेशन व फार्मर कप स्पर्धेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी कृषी अधिकारी प्राजक्ता तायडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांसाठी महाविस्तार AI ॲपची माहिती देवून शेतकऱ्यांकडून ते डाउनलोड करून नोंदणी करून घेतली. पाणी फाउंडेशन टीममधील प्रशिक्षक जयकुमार सोनुले यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तर प्रफुल्ल कोल्हे यांनी गट शेती तसेच गटांमधील शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या पिकांबद्दल बाबत माहिती दिली.

  प्रशिक्षणात पुढे होणाऱ्या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाची माहितीही देण्यात आली. प्रशिक्षणाच्या शेवटी पाणी फाउंडेशन टीमने शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रशिक्षक रेणुका पोहोकार व प्रशांत देवरे यांनी निवासी प्रशिक्षणाची नोंदणी यावेळी करून घेतली. या प्रशिक्षणास कृषी विभागातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, पोकरा गावातील कृषी ताई तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक रुपाली चौधरी यांनी तर आभार मंडळ कृषी अधिकारी नीतिमान व्यवहारे यांनी मानले.

000000

संबंधित पोस्ट

रस्त्यावरील खडयामुळे अपघाताने मृत्यु झाल्यास आता कुटुंबाला 6लाख रुपये मिळणार-प्रा.डॉ.जयपाल पाटील

vishwatmaklokswamivarta

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देशभरात २० हजारांहून अधिक भाविकांकडून ‘सामूहिक हनुमान चालीसा पठण’ !मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक हिंदूंनी घेतला या उपक्रमाचा लाभ !

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

शेख मुकरम यांच्या हस्ते बालाजी सोनटक्के यांचा सत्कार

लातूर जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर

कुंभ उद्योग संगम व नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषदेचे काटेकोर नियोजन करावे – दीपेंद्र सिंह कुशवाह