vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंबिया बहार फळपीक विमा मंजूर: 3 हजार 910 शेतकऱ्यांच्याखात्यात लवकरच जमा होणार नुकसान भरपाई

आंबिया बहार फळपीक विमा मंजूर: 3 हजार 910 शेतकऱ्यांच्याखात्यात लवकरच जमा होणार नुकसान भरपाई

       अमरावती, प्रतिनिधी): प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार 2024-25 मध्ये अमरावती जिल्ह्यातील 3 हजार 910 शेतकऱ्यांसाठी 18.30 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात या योजनेत सुमारे 4 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता, परंतु हवामान धोके (ट्रिगर) लागू करण्याबाबत शासन निर्णयातील कमाल व किमान तापमानाची स्पष्टता नसल्यामुळे युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीने आक्षेप घेतला होता. जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यानंतर कंपनीने केळी पिकासाठी 12 महसूल मंडळांत, मोसंबीसाठी 10 महसूल मंडळांत आणि संत्रा पिकासाठी 45 महसूल मंडळांत अखेर हवामान धोके मंजूर केले.

 यामध्ये, 138 केळी उत्पादकांना 91.39 लक्ष रुपये, 46 मोसंबी उत्पादकांना 11.62 लक्ष रुपये, तर 3 हजार 726 संत्रा उत्पादकांना 17.27 कोटी रुपये असे एकूण 3 हजार 910 शेतकऱ्यांसाठी 18.30 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम लवकरच अर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल, अशी माहिती कंपनीने दिली असून, प्रलंबित दावे मंजूर झाल्यामुळे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी शेतकऱ्यांना आंबिया बहार 2025-26 मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

मुंढवा पुणे येथील पासपोर्ट सेवा केंद्राचे पाषाण येथे स्थलांतरण

नवी दिल्लीत माणीकशॉ केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयेाजित कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले संबोधित आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा . 

vishwatmaklokswamivarta

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025 चे आयोजन

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रांचे लवकरच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हस्ते उद्घाटन..

एल्डर लाईन – १४५६७; ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन