vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी सुटी जाहीर

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना 1 आणि 2 डिसेंबर रोजी सुटी जाहीर

     अमरावती, प्रतिनिधी: अमरावती जिल्ह्यात आगामी नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमुळे संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांना 1आणि 2 डिसेंबर 2025 रोजी सुटी राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

    निवडणुकीच्या कामासाठी मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाणे व मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडता यावी, यासाठी अमरावती जिल्ह्यातील संबंधित सर्व नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

     या निवडणूक कार्यक्रमानुसार, मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी अध्यक्ष व सदस्य पदाकरिता मतदान होणार आहे. त्यामुळे, मतदान अधिकारी/कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राचा ताबा घेणार असलेल्या सोमवार, दिनांक 1 डिसेंबर 2025 आणि मतदानाच्या दिवशी म्हणजेच मंगळवार, दिनांक 2 डिसेंबर 2025 असे दोन दिवस जिल्ह्यातील संबंधित नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी असेल, असा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला आहे.

00000

संबंधित पोस्ट

तुप्पा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद ७४२ सातबारा व ५१२ आठ-अ उताऱ्यांचे वाटप; ४५ जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

vishwatmaklokswamivarta

वादग्रस्त भोंदूबाबा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा.

ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून-पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरूवात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महावितरणमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन-अमेरिकेच्या ‘द रॉकफेलर फाउंडेशन’, ‘ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट’ व ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून उपक्रम

vishwatmaklokswamivarta

महाराजस्व समाधान शिबिरात विविध शासकीय दाखल्यांचे वाटप; मांगरुळ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक-टीसीएस कार्पोरेट जिहाद प्रकरणी मुख्य सूत्रधार फरार आरोपी निदा खानला नगरसेवक मतीन पटेल याने आपल्या घरी आश्रय दिल्याच्या आरोपावरून संभाजीनगर महानगरपालिकेची ऑफिस आणि घराची तोडक कारवाई

ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची न भरून येणारी हानी – उपसभापती सचिन अहिर