vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025 चे आयोजन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025 चे आयोजन

ठाणे प्रतिनिधी- ठाणे जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात होत असलेली उल्लेखनीय कामगिरी ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंचा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग व्हावा, विद्यार्थ्यांना विविध खेळांची माहिती व्हावी या उद्देशाने ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत “मोफत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण” शिबिराचे आयोजन दि.21 ते 30 मे 2025 दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे सुवर्णा बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये कबड्डी, जिम्नॅस्टीक्स्, वेटलिफ्टींग, हॅन्डबॉल, सॉफ्टबॉल, रग्बी, पॉवरलिफ्टींग यांसारख्या विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यापैकी हॅन्डबॉल, बेसबॉल, सॉफ्टबॉल, रग्बी, पॉवरलिफ्टींग या खेळांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन दि.21 मे 2025 रोजी बी.के.बिर्ला महाविद्यालय, कल्याण येथे पार पडला. या उद्घाटन समारंभास बी.के.बिर्ला महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रशासकीय प्रमुख श्री.सेहेल, उपप्राचार्य डॉ.हरीश दुबे, शारिरीक शिक्षण विभाग चेअरमन अनिल तिवारी, क्रीडा संचालक यज्ञेश्वर बागराव तसेच कार्यालयाचे मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी सुचिता तेंडूलकर, क्रीडा मार्गदर्शक समीर सुर्यवंशी, क्रीडा कार्यकारी अधिकारी धमेंद्रकुमार यादव, सहा. क्रीडा विकास अधिकारी लक्ष्मी ठाणेकर तसेच ठाणे जिल्हा बॉक्सींग असोसिएशनचे सचिव सागर पेडणेकर उपस्थित होते. बी.के.बिर्ला महाविद्यालयाचे शिक्षक, प्रशिक्षकांमध्ये चिंतामण पाटील, अक्षय टेंभे, शुभम मोहपे यांचा समावेश होता.

तसेच जिम्नॅस्टीक्स् आणि वेटलिफ्टींग या खेळांच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन दि.21 मे 2025 रोजी तालुका क्रीडा संकुल, ठाणे येथे पार पडला. या उद्घाटन समारंभास आंतरराष्ट्रीय खेळाडू आर्यन दवंडे, वेटलिफ्टिंग राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक दत्तात्रय टोळे, जिम्नॅस्टीक्स् आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक लेव्हल 2 व आंतरराष्ट्रीय पंच लेव्हल 3 श्रीमती प्रणाली, दाक्षम अकादमीच्या संस्थापक जयश्री बाबुळकर, क्रीडा मार्गदर्शक श्रद्धा तळेकर यांचा समावेश होता.

00000

संबंधित पोस्ट

सोमठाणा खुर्द येथील प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळणार; कागदपत्रे सादर करण्याचे अकोट वन्यजीव विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७.१४% मतदान झाले.

vishwatmaklokswamivarta

खते, बियाणे, कीटकनाशकांची तपासणी करा-अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई कर     – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

वर्षागणिक वाढत्या हिरवाईचा उपहार संत निरंकारी मिशनचे वननेस वन अभियान निसर्ग कॉलनी परिसरात होणार वृक्षारोपण

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी वैभवराजे मोहिते सिद्धेश्वर पवारही नवीन जिल्हाध्यक्ष

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दाव्याविना 176 कोटी रुपये पडून दावा न केलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठीची मोहीम..

vishwatmaklokswamivarta