vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अमृतची विशेष अर्थसहाय्य योजना; पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले

यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अमृतची विशेष अर्थसहाय्य योजना; पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले

राज्य प्रतिनिधी बुलढाणा,  महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारी योजना राबविण्यात येत असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेचा लाभ सन २०२६-२७ मधील यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुख्य परीक्षा तसेच मुलाखतीची तयारी करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांना मिळणार आहे. अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पाटील, राजपूत, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहारणा, कानबी आदी समाजघटकांचा समावेश आहे.

योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच मुलाखत पूर्वतयारीसाठी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसार ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज सादर करण्यासाठी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. योजनेबाबतची सर्व माहिती, सूचना व अद्यतने अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत कोणतीही अडचण अथवा शंका असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी किंवा ९११२२२७६३७, ८३०८९९८९२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अमृत कार्यालयाचे व्यवस्थापक जिगणेश जी. कमानी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

आश्रमशाळेतील प्रश्नांवर आदिवासी मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा,आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने मंत्री, सचिव, आयुक्तांसोबत सहविचार सभा…

समडोळी येथे शास्त्रज्ञ व शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न

नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे केंद्री मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला.

अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन समन्वयाने काम करावे-राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

vishwatmaklokswamivarta

रामनवमी शोभायात्रेच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्र्यांकडून आढावा

मुंबई शहर व उपनगरात म्हाडाच्या जागांवरील अनधिकृत बांधकाम;चौकशी करून कारवाई होणार- मंत्री उदय सामंत