vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

समडोळी येथे शास्त्रज्ञ व शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न

समडोळी येथे शास्त्रज्ञ व शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न

सांगली, प्रतिनिधी : भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, कृषी विज्ञान केंद्र, सांगली, कृषी विभाग सांगली आणि आत्मा प्रकल्प सांगली यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित “विकसित कृषी संकल्प अभियान” हा महत्वाकांक्षी कार्यक्रम मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला.

कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र कांचनपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. विपिन वाले, मृदा शास्त्रज्ञ शैलेश पाटील, कृषी विस्तार शास्त्रज्ञ सचिन कोल्हे, कृषि संशोधन केंद्र किड व रोग शास्त्रज्ञ डॉ. सचिन महाजन, अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामतीचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. सुधीर कुमार मिश्रा, पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळचे डॉ. अभिजीत बाराते, आत्मा प्रकल्प तालुका तांत्रिक व्यवस्थापक वैभव यादव, उपकृषी अधिकारी रविकांत माने, सहाय्यक कृषी अधिकारी दिलीप मिरेकर, माजी सरपंच महावीर चव्हाण आदि उपस्थित होते.

वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विपिन वाले यांनी पशुपालन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. दुधाचे दर फॅट वर अवलंबून असतात त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी. संतुलित आहार देणे आवश्यक आहे . मुरघास, अझोला, स्वच्छ दुग्धोत्पादन, जनावरांची विविध खाद्ये याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

मृदा शास्त्रज्ञ शैलेश पाटील यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचा सल्ला दिला. त्यानुसार खताची मात्रा पिकांना द्यावी असे सांगितले.

किड व रोग शास्त्रज्ञ डॉ. महाजन म्हणाले, जैविक खताचा व किटक नाशकांचा वापर करावा. सोयाबीनच्या विविध जाती शेतकऱ्यांना कृषि संशोधन केंद्रात उपलब्ध आहेत. मातीतील जिवाणू वाढवा, त्यासाठी जैविक खताचा उपयोग करावा. सोयाबीनची बीजप्रक्रिया करूनच पेरणी शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

कृषी विस्तार शास्त्रज्ञ सचिन कोल्हे म्हणाले, आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेती काळाची गरज असून शेतकऱ्यांनी सेंद्रिय भाजीपाला, पिके घ्यावी.डॉ. सुधीर कुमार मिश्रा म्हणाले, मानव व पशुधनाच्या सुरक्षेसाठी “दामिनी” आणि “मेघदूत” या मोबाईल अॅप्सचा वापर करून नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करावा.

सूत्रसंचालन रविकांत माने यांनी केले. आभार दिलीप मिरेकर यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी, शेतकरी गट, महिला शेतकरी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यावर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज 15 जुलैपर्यंत करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव -**‘उकलुया हस्तरेखांचे गूढ’*

पर्यावरण दिनाचा मुहूर्त साधून जिल्हाभरात वृक्ष लागवडीस प्रारंभ वृक्ष जगवा, माणूस जगेल- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

विधानसभा लक्षवेधी सूचना :बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड काळातील भ्रष्टाचार प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्यात येणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

vishwatmaklokswamivarta