vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय लोकअदालतीत ३५ हजार ९३२ प्रकरणे निकाली; सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड-जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात संपन्न

राष्ट्रीय लोकअदालतीत ३५ हजार ९३२ प्रकरणे निकाली; सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड-जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत उत्साहात संपन्न

अहिल्यानगर, प्रतिनिधी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. ९ मे २०२६ रोजी जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत मोठ्या प्रमाणावर प्रकरणांचा निपटारा होऊन सुमारे ५० कोटी रुपयांची तडजोड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. योगेश पैठणकर यांनी दिली.

    राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातील विविध न्यायालयांमधील दिवाणी व फौजदारी प्रकरणे, धनादेश व चेक अनादर प्रकरणे, बँक कर्जवसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई दावे, कामगार न्यायालयातील प्रकरणे, कौटुंबिक वाद, वीज महावितरणाशी संबंधित समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची दाखलपूर्व प्रकरणे आपसी समझोत्यासाठी ठेवण्यात आली होती.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील एकूण ३३ हजार ८१६ दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली तर २ हजार ११६ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच विशेष मोहिमेंतर्गत ८७८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. अशा प्रकारे एकूण ३५ हजार ९३२ प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली

    राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, सर्व वकील संघटना, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा पोलीस प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी व विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनीही विशेष योगदान दिले.

0000

संबंधित पोस्ट

अभिमानाचा क्षण! 🇮🇳बुलढाणा जिल्ह्याचा सुपुत्र, सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील हवालदार संतोष मोरे यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘शौर्य पदक’ प्रदान

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई इथल्या प्रादेशिक केंद्राने पंढरीची वारी पदयात्रेच्या माध्यमातून शारिरीक तंदुरुस्ती आणि सांस्कृतिक सलोख्याचा केला प्रसार घोषणा आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून फिट इंडिया चळवळीला दिले प्रोत्साहन

vishwatmaklokswamivarta

पशुसंवर्धन विभागाचे काम अधिक गतिमान करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांचे महत्वाचे पाऊल पशुधन विकास अधिकाऱ्यांची २७९५ पदे भरणार..

शिक्षण परिषदेतून शिक्षकांना मिळणार सकारात्मक शिस्तीचे धडे- मंत्री दादाजी भुसे..

vishwatmaklokswamivarta

हुंडा प्रतिबंधक कायद्याची माहिती देणाऱ्या घडीपुस्तिकेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन हुंडा दिला/घेतला नसल्याबाबत ११६७ कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र प्राप्त

आज गेट ऑफ इंडिया ते यशवंतराव चव्हाण सेंटरपर्यंत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे या दिंडीला हिरवा झेंडा दाखवला.

vishwatmaklokswamivarta