vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ११ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता मुंबई येथील श्री धाकलेश्वर मंदिर, महालक्ष्मी कंपाऊंड, भुलाभाई देसाई रोड, मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध कलाकार शुभदा वराडकर यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून, भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचा समृद्ध आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ अंतर्गत आयोजित करण्यात येणारा हा कार्यक्रम श्रद्धा, संस्कृती आणि राष्ट्रीय अस्मितेचा संदेश देणारा ठरणार आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा गौरव आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

संबंधित पोस्ट

राज्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सर्व सामन्यांच्या कामांना तात्काळ प्राधान्य द्या – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

बारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाव

स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यातील बदनापूर कृषी संशोधन केंद्रास सर्व अर्थसहाय्य- कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

निराधार योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा अव्वल !उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान…