vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय लोकअदालतीचे १४ मार्च रोजी आयोजन

राष्ट्रीय लोकअदालतीचे १४ मार्च रोजी आयोजन

सातारा प्रतिनिधी: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा तसेच सर्व तालुका न्यायालयात शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी दिली आहे.

जिल्हयातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तडजोड होवू शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावयावी असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे आहे असे संबंधित अधिक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिलांना कळवावे. लोक अदालतीत तडजोड झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेल, क्षुल्लक वादाचे पर्यावसन कायमस्वरूपी वादात होणार नाही हाच लोक अदालतीचा हेतू आहे. शिवाय लोक अदालतीतील निकालाविरुध्द अपील होत नाही. वेळेची व पैशाची बचत होते.

लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे ठेवावयाची असल्यास संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहनही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी केले आहे

000

संबंधित पोस्ट

मुळशी–मावळ टप्प्यात ल्यूक मडग्वेचे वर्चस्व; हर्षवीर सिंग सर्वोत्तम भारतीय सायकलपटू बजाज पुणे ग्रँड टूर २०२६

vishwatmaklokswamivarta

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

जेईई,नीट,सीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि डॉन बॉस्को हायस्कूलची निवड

vishwatmaklokswamivarta

संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- विधानमंडळात 51 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन…

vishwatmaklokswamivarta

राजकारण हे गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे माध्यमआमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन,जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे येथे ८ वी युवा संसदआ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना आदर्श आमदार पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta