vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राजकारण हे गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे माध्यमआमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन,जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे येथे ८ वी युवा संसदआ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना आदर्श आमदार पुरस्कार प्रदान

राजकारण हे गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे माध्यमआमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन,जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे येथे ८ वी युवा संसदआ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना आदर्श आमदार पुरस्कार प्रदान

राज्य प्रतिनिधी

राजकारणाबद्दल अनेकांच्या मनात नकारात्मक भावना असतात आणि अनेकजण त्या उघडपणे व्यक्तही करतात. मात्र, राजकारण केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसून ते गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री, आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ते पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स येथे आयोजित आठव्या युवा संसदमध्ये बोलत होते. यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांना ‘आदर्श आमदार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अशा पुरस्कारामुळे शंभरपट अधिक शक्तीने काम करण्याची ऊर्जा मिळते, अशी भावना यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.चंद्रकांतदादा पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री राज्यसभा सदस्य श्री. भागवत कराड, खासदार अरविंद सावंत, आमदार सत्यजित देशमुख, आमदार अमित गोरखे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी युवकांना अनेक उदाहरणे आणि कथांच्या संदर्भातून राजकारणाचे आणि त्यातील गांभीर्याचे महत्त्व पटवून दिले.

राजकारण म्हणजे निवडणूक हा चुकीचा समज आहे. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नाही. राजकारणाचा उपयोग समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी असावा असे आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. देश बदलायला हवा, देश पुढे जायला हवा, असे प्रत्येकाला वाटते मात्र हे साध्य करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. राजकारण त्या परिवर्तनाची संधी देते, असे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली.राजकारणातून अनेक चिरकाल परिवर्तनकारी कार्य करण्याची संधी मिळते. राजकारणात न जाण्याचा सल्ला देणे हा चुकीचा भ्रम आहे. गोरगरीब, शोषीत वंचितांचे मन जिंकण्याचे माध्यम म्हणजे राजकारण आहे, असेही ते म्हणाले.

युवा संसदेचे उत्तम आयोजन आणि नियोजनाबद्दल त्यांनी डॉ. सुधाकरराव जाधवर व शार्दुल जाधवर यांचे अभिनंदन केले. वनमंत्री असताना गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात गेल्याची आठवण श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितली.जनतेच्या हितासाठी कल्याणकारी निर्णय घेण्याचे कार्य राजकारणातून होते, असेही आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

संबंधित पोस्ट

जैन समाजाची सेवा, त्याग व अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन ६४ वा जैन दीक्षा समारंभ

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भविष्यासाठी महाराष्ट्र सज्ज; डेटा सेंटर क्षेत्रात राज्य आघाडीवर – पणन मंत्री जयकुमार रावल

स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याच्या यशस्वीतेसाठी राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही· केंद्रीय शहरी विकास मंत्र्यांनी राज्यांकडून घेतला स्वच्छताविषयक उपक्रमांचा आढावा…

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव पर्यटन रेल्वेगाडीला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार

vishwatmaklokswamivarta

महिला स्वयंसहायता गटांच्या उत्पादन विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, केईएम रुग्णालयात उपचार सुरू..

vishwatmaklokswamivarta