vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शहीद जवान चंद्रकांत काळे यांच्या पार्थिवावर वडूज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*

शहीद जवान चंद्रकांत काळे यांच्या पार्थिवावर वडूज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार*

 

सातारा,प्रतिनिधी- शहीद वीर जवान चंद्रकांत काळे यांच्या पार्थिवावर आज खटाव तालुक्यातील वडूज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 अंत्यसंस्काराच्या ठिकाणी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दिलीप येळगावकर, प्रांताधिकारी उज्वला गाडे, प्रभाकर देशमुख ,,तहसीलदार बाई माने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. वीरपत्नी मनीषा, आई किशाबाई, वडील महादेव, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती, भाऊ हिराचंद यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर मुलगा श्रेयस यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.

यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्न-प्रलंबित सौर प्रकल्प जलद गतीने पूर्ण करा -मंत्री अतुल सावे

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दशकपूर्तीनिमित्त उद्या मुंबईत सोहळा

ताजनापूर उपसा सिंचन टप्पा-१ सुप्रमासाठी प्रस्ताव सादर करावा- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

24 मार्चला जालना येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन• नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना:३१ हजार ५५६ पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित गावात प्रसिद्ध; योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी व ॲग्री-स्टॅक नोंदणी तातडीने करण्याचे आवाहनजिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक

उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्लागार समितीची बैठक.