vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महिला स्वयंसहायता गटांच्या उत्पादन विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

महिला स्वयंसहायता गटांच्या उत्पादन विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:-ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मिनी सरस व जिल्हास्तरीय स्वयंसहायता गटांच्या उत्पादन विक्री व प्रदर्शन 2026 चे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि.20 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता समुद्र किनारा, अलिबाग येथील मैदानावर होणार आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प.रायगड श्रीमती प्रियदर्शनी मोरे यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले तसेच रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विविध लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.दि.20 मार्च ते दि.24 मार्च 2026 सकाळी 10.00 ते रात्री 10.00 वा. या कालावधीत महिला स्वयं सहाय्यता गटांनी उत्पादन केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री विशेष आकर्षण असणार आहे.

शुक्रवार, दि.20 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 ते रात्री 8.00 मान्यवरांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन, स्वयंसहाय्यता गटातील महिलाची क्षमता बांधणी कार्यशाळा.

शनिवार दि.21 मार्च 2026 , रोजी, दुपारी 3.00 ते रात्री 10.00 वा. शेतकरी मेळावा व मार्गदर्शन.रविवार दि.22 मार्च 2026, रोजी, दुपारी 3.00 ते सायं. 6.00, लखपती दीदी क्षमता बांधणी कार्यशाळा, सायं. 6.00 ते रात्री 9.00, खेळ पैठणीचा कार्यक्रम, गवळणः आडवाटेची आध्यत्मिक यात्रा लोकनृत्याचा कार्यक्रम.सोमवार दि.23 मार्च 2026, रोजी सायं.4.00 ते सायं.7.00 जिल्हा परिषद अधिकारी/कर्मचारी यांचा “ऑर्केस्टा शिवतीर्थ (हिंदी व मराठी गाण्याचा बहारदार कार्यक्रम).मंगळवार दि.24 मार्च 2026, दुपारी 3.00 ते रात्री 10.00, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान कार्यशाळा, महा आवास अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पुरस्कार वितरण, समारोप.दरम्यान, मंगळवार, दि. 24 मार्च 2026 रोजी दुपारी 3.00 वाजता समारोप समारंभ आयोजित करण्यात आला असून, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम आणि अभिनेत्री श्रीमती रंजना काळे उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनामध्ये महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स, विक्री व प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. तसेच, विविध प्रशिक्षण कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

संस्कारक्षम अशा बालवयातच पालकांनी पाल्यावर लक्ष द्यावे-: अश्विनी पांचाळ मानसिक दृष्ट्या सक्षम व्हा, कुठलाही तणाव घेऊ नका-: मानसी नोपानी

vishwatmaklokswamivarta

महिला सक्षमीकरणासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्नशील रहावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन उत्साहात साजरा • जिल्हाधिकारी आाशिमा मित्तल यांचा राज्यस्तरीय सन्मान 

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गाचे नियमन

सहकार व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सुरू

vishwatmaklokswamivarta

महा टीईटी परीक्षा – एक प्रश्न छपाई दोषामुळे रद्द

vishwatmaklokswamivarta