vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह घणसोली, सेक्टर-2 वसतिगृहाकरिता खाजगी इमारत भाडेतत्वावर घेण्याकरीता इच्छुक इमारत मालकांचे अर्ज करावेत

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह घणसोली, सेक्टर-2 वसतिगृहाकरिता खाजगी इमारत भाडेतत्वावर घेण्याकरीता इच्छुक इमारत मालकांचे अर्ज करावेत

ठाणे, प्रतिनिधी:- सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन 2025-26 मध्ये घणसोली, सेक्टर-2, नवी मुंबई, जि.ठाणे येथे 250 विद्यार्थीनी संख्येचे शासकीय वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. त्याकरिता वसतीगृहासाठी घणसोली, सेक्टर-2, नवी मुंबई परिसरातील इमारत मालक/बांधकाम विकासक यांच्याकडून खालील तपशीलातील नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून अर्ज/निविदा मागविण्यात येत आहेत.वसतिगृहाचे नाव: मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह घणसोली, सेक्टर-2, नवी मुंबई, जि.ठाणे.

इमारतीचा तपशील:1. खाजगी इमारत घणसोली, सेक्टर-2, नवी मुंबई परिसरात असणे आवश्यक आहे. 2. किमान क्षेत्रफळ 20,000 चौ. फुट असावे. 3. या इमारतीमध्ये 25 स्वच्छतागृह व 25 स्नानगृहाची सुविधा असावी. 4. ही इमारत अधिकृत असावी व पूर्णत्वाचा दाखला असावा. 5. इमारतीचे भाडे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरविल्यानुसार इमारत मालक देण्यास तयार असल्याबाबत संमतीपत्र देणे आवश्यक राहील.तरी इच्छुक इमारत मालक / बांधकाम विकासक यांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे, 4 था मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दत्तवाडी, स्वामी समर्थ मठासमोर, कळवा, ठाणे यांच्याकडे लेखी स्वरुपात अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे-दुचाकी, चार चाकी, परिवहन व ऑटो या नवीन मालिका सुरू

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी  प्रत्यक्ष भेट देऊन नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी

vishwatmaklokswamivarta

माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे- संचालक हेमराज बागुल

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रदर्शनाचे उद्घाटन… जिल्हा प्रशासनाद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची विविध माध्यमांद्वारे प्रचार-प्रसिद्धी मोहीम सुरु

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 7036 झाडांची छाटणी – पावसाळी कालावधीत काळजी घेण्याचे आवाहन

सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा