vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाशिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाशिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

        सांगली, प्रतिनिधी : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील नवीन प्रवेशित व नूतणीकरण विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क, छत्रपती राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार व निवार्ह भत्ता या योजनांचे ऑनलाईन अर्ज दि. 30 जून 2025 पासून https://mahadbt.maharashtra .gov.in या संकेत स्थळावर स्विकारण्यात येत आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी या योजनांचे ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

 सन 2023-24 मध्ये शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जामधील त्रुटींची पुर्तता अद्याप झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांकरिता Re-Apply TAB उपलब्ध करुन दिलेला आहे. तसेच सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता ज्या पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अद्याप भरलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याकरीता 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सांगली कार्यालय, जुना बुधगांव रस्ता, सामाजिक न्याय भवन सांगली येथे संपर्क करावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

विशेष वृत्त :सखी वन स्टॉप सेंटर म्हणजे पीडित महिलांच्या हक्काचा आधारवड

काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य माजी मंत्री आरिफ (नसीम) खान यांची टीका …

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

दहा लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दोरी तुमच्या हाती…’जिल्हाधिकारी स्वामी यांचे महिला सक्षमीकरण कार्यशाळेत आवाहन

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी..

पाकिस्तानला पुन्हा घरात घुसून ठोकलं; भारतीय सैन्याकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते… 💥🔥