vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

माधवनगर येथे री-केवायसी व वित्तीय समावेशन शिबीर संपन्न

माधवनगर येथे री-केवायसी व वित्तीय समावेशन शिबीर संपन्न

सांगली, प्रतिनिधी: बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आय.सी.आय.सी.आय. बँक आणि एच.डी.एफ.सी. बँक यांच्या संयुक्त विद्यमाने री-केवायसी शिबिर घेण्यात आले. जाखोटिया मंगल भवन माधवनगर येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन रिझर्व बँक ऑफ इंडियाचे उप महाव्यवस्थापक जीनो जया सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक के. सुनिता दुर्गा, भारतीय स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक आशुतोष भिडे, सुधीर कुमार, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ, रिझर्व्ह बँकेचे अक्षय गोंडेवार, प्रीती पवार, सचिन कुलकर्णी, अमोल पाटील व 250 च्या आसपास ग्राहकवर्ग उपस्थित होते.

यावेळी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे उप महाव्यवस्थापक जीनो जया सिंग यांनी R-KYC करणे, शिबिरात नवीन जनधन खाते उघडणे, तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती व सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना विषयी माहिती देऊन त्याची नोंदणी करून घेणे यासंबंधी मार्गदर्शन केले. या मोहिमेत ग्रामपातळीवर कोणतीही व्यक्ति आर्थिक समावेशन योजनांपासून वंचित राहू नये यासाठी ग्रामपंचायतीने बँकांना पूर्ण सहकार्य करावे. शिबिराची मोहीम 30 सप्टेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. प्रत्येक नागरिकाने या योजनांचा लाभ घ्यावा आणि आपल्या परिचयातील लोकांनाही याची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या प्रसंगी अक्षय गोंडेवार यांनी डिजिटल फसवणुकीपासून संरक्षण, केवायसीची भूमिका, तसेच बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर याविषयी उपस्थित ग्राहकांना सखोल माहिती दिली. तसेच भारतीय रिझर्व बँकेचे कार्य व भूमिका यावेळी त्यांनी विषद केली.

या प्रसंगी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना व सुरक्षा विमा योजनामध्ये नोंदणी असलेल्या ग्राहकांचा अपघाती मृत्यू पावलेल्या ग्राहकांच्या वारसांना 2 लाख रूपये रकमेचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

प्रास्ताविकात अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ यांनी डिजिटल अरेस्ट वरून होणारी फसवणूक, जास्त परताव्याच्या फसव्या योजनांपासून ग्राहकांनी दूर राहिले पाहिजे असे सांगितले. तसेच ग्रामस्थांनी सर्व योजनांचा लाभ घ्यावा व R-KYC नोंदणीकरिता बँकेचे ग्राहक सेवा केंद्र किंवा शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोक अदालतीत ४ हजार ३६१ प्रकरणांचा निपटारा१९.१७ कोटींची तडजोड रक्कम वसूल..

आसाममध्ये दरांग येथे सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या विकास कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पायाभरणी आणि उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे हरभरा नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ !आ.मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या पाठपुराव्याला मिळाले यश,

खामगाव शहरातील 46 पाणटपरीधारकांवर कारवाई

vishwatmaklokswamivarta

भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा…

योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन योग ही निरोगी, सशक्त आणि सकारात्मक जीवनाची गुरुकिल्ली