vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्ह्यात आजपासून स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानतालुकास्तरीय आरोग्य शिबिरांचा महिलांनी लाभ घ्यावा- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

जिल्ह्यात आजपासून स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानतालुकास्तरीय आरोग्य शिबिरांचा महिलांनी लाभ घ्यावा- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

  सांगली, प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात दि. 17 सप्टेंबर ते दसऱ्यापर्यंत स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामिण रुग्णालय येथे महिलांच्या 20 प्रकारच्या आरोग्य तपासण्या, उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने आयोजित या शिबिराचा शुभारंभ उपजिल्हा रुग्णालय कवठेमहंकाळ येथे दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या अभियानांतर्गत महिला व बालकांमध्ये आरोग्याविषयी जागृती वाढविण्यासाठी आणि महिलांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

या अभियानांतर्गत रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग तपासणी, स्तन व गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग तपासणी, सिकलसेल आजार व रक्तक्षय तपासणी, तसेच गरोदर आणि स्तनदा मातांसाठी तसेच लहान बाळांसाठी योग्य आहार, मासिक पाळी स्वच्छता व पोषण विशेष तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन, निरोगी जीवनशैली आणि पोषण, स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन असे विविध तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच माता व बालसुरक्षा कार्ड, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कार्ड, पोषण ट्रॅकर मध्ये लाभार्थी नोंदणीत नागरिकांचा सक्रिय सहभाग, रक्तदान शिबिर, निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी, अवयवदान नोंदणी या सुविधा तसेच मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे.

शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे – दिनांक 17 सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ 18 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, बेळंकी, 19 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, भिवघाट, 20 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, आटपाडी, 22 सप्टेंबर ग्रामीण रूग्णालय विटा, 23 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, पलूस व ग्रामीण रुग्णालय, तासगाव, 24 सप्टेंबर उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर, 25 सप्टेंबर उपजिल्हा रुग्णालय, शिराळा, 26 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, माडग्याळ, 27 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, चिंचणी वांगी, 29 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, कडेगाव, 30 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, जत व 1 ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, कोकरूड व ग्रामीण रुग्णालय, आष्टा.

000000

संबंधित पोस्ट

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ

ठाणे जिल्ह्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान ‘अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान२०४७ पर्यंत सिकलसेल मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र, बुलढाणा येथे जागतिक हाताची स्वच्छता जनजागृती दिनानिमित्त हात धुण्याच्या योग्य पद्धतीचे प्रात्यक्षिक

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद१,६९९ लसीकरण बूथवर १ लाख १७ हजारांहून अधिक बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस

महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

रूग्णालयातील स्टोअरमधून औषध खरेदीची सक्ती नको‘एफडीए’चा इशारा