vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, केईएम रुग्णालयात उपचार सुरू..

लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, केईएम रुग्णालयात उपचार सुरू..

राज्य प्रतिनिधी-मुंबईतील लालबाग परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर, ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. ही ह्रदयद्रावक घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

अज्ञात व्यक्ती भरधाव वाहनाने विरूद्ध दिशेनं आला. त्या व्यक्तीने झोपलेल्या मुलांना धडक दिली. या धडकेत चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत जागीच मृत्यूमुखी पडली. तर जखमी मुलावर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये सर्वत्र बाप्पाच्या मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू असतानाच एक धक्कादायक अशी घटना घडली आहे. लालबाग राजाच्या परिसरात भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये दोन चिमुरड्यांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लालबाग राजाच्या मिरवणुकीला काही वेळ शिल्लक असतानाच ही घटना घडली आहे. आज गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या जल्लोषात भाविक आहेत. सकाळपासूनच एक लगभग रस्त्यावर बघायला मिळत आहे. आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत आणि एक वेगळाच उत्साह बघायला मिळत आहे. मात्र, बाप्पाला निरोप देत असतानाच आता एक धक्कादायक घटना घडली आहे. लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ही घटना लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशव्दाराच्या समोर घडली. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडल्याने खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, ही दोन्ही मुलं फुटपाथवर झोपली होती. यामधील एका मुलाचा मृत्यू झाला आहे आणि एक जण गंभीर जखमी आहे. पुढील तपास सुरू आहे

संबंधित पोस्ट

मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी बसचालक संजय मोरे याचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला 

vishwatmaklokswamivarta

असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम व संशोधन महत्वाचे : राज्यपाल जिष्णू देव वर्मा…

विधानपरिषद लक्षवेधी सूचना :मुंबईतील अनधिकृत बांधकामांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी- उद्योग मंत्री उदय सामंत

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत ७ मार्च रोजी लातूर तालुक्यात हरंगुळ मंडळातील टाकळी (शि) येथे समाधान शिबीर

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वितरण आणि १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण  -माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta

आर्चरी वर्ल्ड कपमध्ये ‘सुवर्ण’ भेद करणाऱ्या कुमकुम मोहोडचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार