शिक्षणमत्री धर्मेद्र प्रधान याच्या राजिनाम्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुग याच्या उपोषणाला खोरिपाचा पाठिंबा-
नागपूर:- प्रतिनिधी –
रिपब्लिकन पक्ष खोरिपा च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नीट पेपर फुटीला जबाबदार धरून शिक्षणमत्री धर्मेंद्र प्रधान यानी राजीनामा द्यावा याकरिता दिल्ली येथे सुरु असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुग
याच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे.केंद्रीय निट परिक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी धरुन सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुग याच्या उपोषणाला एकविस दिवस झाले तरी केंद्र सरकारने कोणतीही हालचाल केली नाही त्यांचा खोरिपा च्या वतीने निषेध व्यक्त करून सोनम वांगचुग च्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
बैठकीत सभासद नोदणी मोहिमेला सुरवात करण्यात आली असून सघटनात्मक बाधणी करण्यासाठी जिल्हा, शहर तसेच प्रदेश कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे औगस्ट व सप्टेंबर महिन्यात सर्व कार्यकारिण्या निवडण्यासाठीचा कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्यात आला आहे
त्याचबरोबर येत्या २ व ३ आक्टोंबर ला संभाजी नगर (औरंगाबाद) येथे रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) चे राष्ट्रीय अधिवेशन आणि नामांतरवीर माजी आमदार दिवगत उपेन्द्र शेंडे यांची ७५ वी जयंती तथा रिपब्लिकन पक्षाचा स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे.अधिवेशन प्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षा सह राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे, त्यासाठी ग्रामीण, तालुका, जिल्हा, विभाग प्रदेश, प्राथमिक सदस्य नोंदणी करून त्यानतर अधिवेशनात राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहेत.
रिपब्लिकन पक्ष( खोरिपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा देशक गिरीशबाबू खोब्रागडे याच्या अध्यक्षतेखाली सपन्न पडलेल्या ह्या बैठकीला राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राचार्य गोपीचंद मेश्राम,डौ शिवशकर बनकर,सरचिटणीस उत्तमराव गवई, प्रवक्ते डौ एन व्हि ढोके, प्रशिक आनंद, सघटक सचिव भिमराव चौरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे, कार्याध्यक्ष डौ देवेश काबळे, सरचिटणीस जीवन बागडे,प्रा अशोक ढोले, उपाध्यक्ष नानासाहेब देशमुख, विनोद साळवी,विजय मेश्राम,मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत काबळे, सरचिटणीस विक्रांत पाटील,विदर्भ प्रदेश अध्यक्ष सी पी रामटेके, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष सजीवकुमार ईखारे, नागपूर प्रदेश अध्यक्ष डौ विनायक गणवीर, प्रदेश कोषाध्यक्ष एड मुकुद धाकटे, वर्धा जिल्हा अध्यक्ष विनायकराव ताकसांडे,सिद्धार्थ रामटेके,चद्रपूर जिल्हा अध्यक्ष मुन्ना भाऊ खोब्रागडे,आनंद वानखेडे, सुदर्शन मून,चद्रमणी गजभिये,रविभिऊ सातदिवे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन बागडे यानी दिली आहे