vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

तेहरानमधल्या भारतीय दुतावसानं भारतीय नागरिकांसाठी सुधारित सल्ला जारी-कुठल्याही कारणासाठी इराणचा प्रवास करु इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरक्षा परिस्थितीत सुधारणा होईस्तोवर सध्या आपला प्रवास पुढे ढकलावा..

तेहरानमधल्या भारतीय दुतावसानं भारतीय नागरिकांसाठी सुधारित सल्ला जारी-कुठल्याही कारणासाठी इराणचा प्रवास करु इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरक्षा परिस्थितीत सुधारणा होईस्तोवर सध्या आपला प्रवास पुढे ढकलावा..

 विदेश प्रतिनिधी

तेहरानमधल्या भारतीय दुतावसानं भारतीय नागरिकांसाठी सुधारित सल्ला जारी केला आहे. कुठल्याही कारणासाठी इराणचा प्रवास करु इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरक्षा परिस्थितीत सुधारणा होईस्तोवर सध्या आपला प्रवास पुढे ढकलावा, असं दुतावासानं म्हटलं आहे.

जे भारतीय सध्या इराणमध्ये राहत आहेत, त्यांनी उपलब्ध विमान पर्यायांनी तात्पुरतं इराण सोडण्याचा विचार करावा. इराणमध्येच राहू इच्छिणाऱ्या भारतीयांनी अत्युच्च खबरदारी पाळावी, त्यांनी सद्यस्थितीबाबत जागरुक राहण्यासाठी बातम्यांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून राहावं आणि दक्षिण किनारपट्टीसारख्या अधिक लष्करी गतिविधींची शक्यता असलेली ठिकाणं टाळावीत, स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, असं दूतावासानं सांगितलं आहे.

ज्या भारतीय नागरिकांनी आपले तपशील दुतावासाकडे अद्याप नोंदवलेले नसतील, त्यांनी ते तातडीनं नोंदवावेत आणि भारतीय दुतावासाच्या संकेतस्थळाला आणि समाजमाध्यमांना नियमितपणे भेट द्यावी असं दुतावासानं म्हटलं आहे.

दुतावासानं आपत्कालीन हेल्पलाईनचे क्रमांकही प्रसिध्द केले आहेत 

संबंधित पोस्ट

जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी. डी. एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे – राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर येलदरी धरणातून पाणीपुरवठ्याबाबत आढावा बैठक

रायगड जिल्ह्यात पुढील ३ दिवस हलका पाऊस व मेघगर्जनेसह सरींचा अंदाज

कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025’चेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन…

vishwatmaklokswamivarta

आज संसद भवन परिसरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते . राहुल गांधी, काँग्रेस नेत्या . प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते  अखिलेश यादव यांच्यासह INDIA आघाडीच्या खासदारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने..

रायगड, रत्नागिरीसह राज्यातील पूरस्थितीचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा**• रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क*• नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन*

हा केवळ श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा स्टॉल नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.