vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

परराज्यातील अवैध मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई; २ कोटी ३० हजाराचा मुद्देमाल जप्त

परराज्यातील अवैध मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई; २ कोटी ३० हजाराचा मुद्देमाल जप्त

मुंबई, प्रतिनिधी: ठाणे जिल्ह्यातील मुंबई – नाशिक महामार्गावर पडघा टोल नाक्याजवळ (ता. भिवंडी) येथे परराज्यातील मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली.

या कारवाईत गोवा स्पिरिट ऑफ स्मूथनेस व्हिस्कीच्या फॉर सेल इन ओन्ली मध्यप्रदेश या परराज्यातील विदेशी मद्याचे २ हजार ३६४ बॉक्स मिळून आले. तसेच एमएच १२ टीव्ही ९००० क्रमांक असलेल्या १६ चाकी वाहनासह, दोन मोबाईल फोन असा एकूण २ कोटी ३० हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत वाहनामधील आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून दोघांना अटक करण्यात आली आहे

राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार कोकण विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली कोकण विभागाच्या भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आलीगुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट करीत आहे, असे विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक यांनी कळविले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे करीत आहेत.

संबंधित पोस्ट

नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक विविध बाबींवरील निर्बंध आदेश निर्गमित  .. 

vishwatmaklokswamivarta

वन्यजीव, पर्यावरण रक्षणासाठी कुंडल वन प्रबोधिनीकडून जनजागृती- मध्य प्रदेशातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद

बाल हक्क संरक्षणासाठी ‘बालरक्षा अभियान’राबवणार – अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह मुख्यमंत्री यांच्या हस्ते बालस्नेही पुरस्कार – २०२४ चे वितरण

vishwatmaklokswamivarta

निरपराध हिंदूंना गुंतवणार्‍या आणि अन्वेषण यंत्रणांचा भांडाफोड करणार्‍या ‘दाभोलकरहत्या आणि मी’ या झंझावाती पुस्तकाचे मुंबई येथे प्रकाशन,बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल !- रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक  

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना; भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर शेतजमीन..

लोककवी वामनदादा कर्डक यांचे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले